आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना आज नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला गेला. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघांमधील हा सामना चांगलाच चुरशीचा ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी आणि धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला २३ धावांनी पराभूत केलं. राजस्थानच्या विजयासाठी नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल या युवा गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजस्थान रॉयल्सने समोर ठेवलेले १९४ धावांचे लक्ष्य गाठण्याठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीला आलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त पाच चेंडू खेळून एका षटाकरच्या मदतीने दहा धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर अनमोलप्रित सिंग फलंदाजीसाठी उतरला. मात्र नवदीप सैनीच्या गोलंदाजीपुढे त्याचा निभाव लागला नाही. अनमोलप्रितने नवदीपने टाकलेल्या चेंडूवर जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पडिक्कलच्या हातात विसावल्यामुळे अनमोलप्रित अवघ्या पाच धावांवर बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या तिकल वर्माने मात्र संघाची फलंदाजी सावरण्याचा प्रयत्न केला.

तिलक वर्माने ३३ चेंडूमध्ये पाच षटकार आणि तीन चौकार यांच्या मदतीने ६१ धावा करुन मोठा खेळ केला. मात्र तिलक वर्माची मुंबईल गरज असताना तो आर अश्विनने टाकलेल्या चेंडूंवर गोंधळल्याने त्याचा त्रिफळा उडाला. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मात्र मुंबईच्या शेवटच्या फळीतील एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे पाचव्या विकेटसाठी आलेल्या कायरॉन पोलार्डवर सामना जिंकण्याची जबाबदारी आली. टीम डेव्हिड (१), डॅनियल सॅम्स (०), मुरगन अश्निन (६) हे खेळाडू लागोपाठ बाद झाले. त्यामुळे शेवटच्या षटकात २९ धावांची गरज निर्माण झाली.

शेवटच्या षटकात मात्र राजस्थानच्या नवदीप सैनीने चांगली गोलंदाजी करत कायरॉन पोलार्डला रोखून धरलं. त्यामुळे मुंबई संघाचा २३ धावांनी पराभव झाला.

याआधी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा हा निर्णय सुरुवातीला योग्य वाटला. कारण सामन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या षटकात यशस्वी जैसवाल फक्त एक धाव करुन बद झाला. जैसवालसारखा तगडा खेळाडू फक्त एक धाव करुन बाद झाल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर लगेच सहाव्या षटकात राजस्थान संघ ४८ धावांवर असताना देवदत्त पडिक्कल टायमल मिल्सने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने सात चेंडूंमध्ये सात धावा केल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसन आणि सलामीला आलेल्या जोस बटरल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडला. या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीच्या फलंदाजीमुळे राजस्थानचा धावफलक खेळता राहिला.

संजू आणि बटलर या जोडीने मैदानावर चांगल्या प्रकारे पाय रोवले होते. या दोघांची जोडी तोडण्याची गरज असल्यामुळे मुंबईच्या रोहित शर्माने पंधरावे षटक टाकण्यासाठी कायरॉन पोलार्डकडे चेंडू सोपवला. पोलाडर्डने आपली जबाबदारी चोख बजावली. त्याने संजू सॅमसनला बाद करण्यात यश मिळवले. संजूने २१ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि एक चौकार यांच्या मदतीने ३० धावा केल्या. सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थानची स्थिती १३० धावांवर तीन गडी बाद अशी झाली. संजू बाद झाल्यानंतर हेटमायर मैदानात उतरला. त्यानेही बटलरला साथ देत १४ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. आपल्या या खेळात हेटमायरने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. दरम्यान बुमराहच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना हेटमायर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र सामना मुंबईच्या बाजूने झुकला.

हेटमायर मैदानावर असेपर्यंत राजस्थान रॉयल्स संघ दोनशेपेक्षा जास्त धावा करेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र हेटमायर बाद झाल्यानंतर रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी चांगली कामिगिरी करु शकले नाहीत. हेटमायार बाद झाल्यानंतर संघ १८४ धावांवर असताना जोस बटलरचा त्रिफळा उडाला. बुमहारने त्याचा बळी घेतल्यानंतर राजस्थानच्या धावसंख्येला ब्रेक लागला. वीस षटके संपण्याआधी राजस्थाच्या रियान परागने पाच धावा केल्या. पराग पाच धावांवर असताना झेलबाद झाला. तर अश्विन फक्त एक धाव करु शकला. नवदीप सैनीने फक्त दोन धावा केल्या. तर ट्रेन्ट बोल्ट नाबाद राहिला.

मुंबईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमहारने चांगली कामगिरी केली. जोस बटलर मैदानात असेपर्यंत मुंबईचे गोलंदाज राजस्थानसमोर निष्प्रभ ठऱत होते. राजस्थानच्या धावसंख्येला लगाम घालने जिकरीचे होत होते. मात्र बुमराहने बटलरचा त्रिफळा उडवला आणि सामन्याचे चित्र पालटले. बुमराहने चार षटकांमध्ये फक्त १७ धावा देत तीन बळी घेतले. तर बुमराहसोबत टायमल मिल्सनेही चार षठकांमध्ये ४६ धावा देत तीन गडी बाद करत राजस्थानला रोखून धरलं. कायरॉन पोलार्डने चार षटकांत ४६ धावा देत एक बळी घेतला.

Story img Loader