IPL 2022 , MI vs RR Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना आज मुंबईतील डी वाय पाटील स्पोर्ट अकॅडमीच्या स्टेडियमवर सुरु आहे. आज रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसन नेतृत्व करत असलेला संघ राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होतेय. या हंगामात मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे आजच्या लढतीत विजय संपादन करण्यासाठी मुंबईचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे आपल्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजयी सुरुवात केली आहे. आजचा सामना जिंकून राजस्थान आपली विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

Live Updates
19:35 (IST) 2 Apr 2022
मुंबई इंडियन्सचा २३ धावांनी पराभव

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदांजी मुंबई संघाला रोखून धरल्यामुळे मुंबईचा २३ धावांनी पराभव झाला. मुंबईच्या कायरॉन पोलार्डने शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र शेवटच्या षटकात २९ धावांची गरज असल्यामुळे हे लक्ष्य त्याला पूर्ण करता आले नाही.

19:07 (IST) 2 Apr 2022
मुंबईला १९ चेंडूंमध्ये ५० धावांची गरज

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक होत आहे. सध्या कायरॉन पोलार्ड आणि मुरगन अश्विन फलंदाजी करत असून मुंबईला सध्या १९ चेंडूंमध्ये ५० धावांची गरज आहे.

19:00 (IST) 2 Apr 2022
मुंबई इंडियन्सला सहावा मोठा धक्का, डॅनियल सॅम्स शून्यावर बाद

मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका बसला आहे. युजवेंद्र चहलने दोन मोठ्या फलंदाजांना तंबूत परत पाठवलं आहे. डॅनियल सॅम्स तर शून्यावर बाद झाला आहे.

18:49 (IST) 2 Apr 2022
मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपात मोठा झटका, तिलक ६१ धावांवर बाद

मुंबईच्या तिलक वर्माने शानदार खेळ केला. मात्र आर. अश्विनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा त्रिफळा उडाला. तिलक वर्माने ३३ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.

18:37 (IST) 2 Apr 2022
इशान किशनचे धमाकेदार अर्धशतक, केल्या ५४ धावा

इसान किशन मैदानावर धमाकेदार खेळ करत असून त्याने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४२ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या आहेत.

18:29 (IST) 2 Apr 2022
मुंबईच्या १०० धावा पूर्ण, राजस्थानला विकेटचा शोध

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मैदानावर पाय रोवले असून राजस्थानचे गोलंदाज इशान किशन आणि तिलक वर्मा ही जोडी तोडण्यासाठी धडपडत आहेत. मुंबईच्या संध्या १०० धावा पूर्ण झाल्या असून आतापर्यंत फक्त दोन गडी बाद झाले आहेत.

18:07 (IST) 2 Apr 2022
मुंबईच्या ५२ धावा, दोन गडी बाद

मुंबई इंडियन्स संघाचे दोन गडी बाद झाले असून संघाच्या सध्या ५२ धावा झाल्या आहेत. सध्या मैदानावर इशान किशन आणि तिलक वर्मा फलंदाजी करत आहेत.

17:44 (IST) 2 Apr 2022
मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा दहा धावांवर झेलबाद

मुंबई इंडियन्सला सामन्याच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा फक्त दहा धावा करुन झेलबाद झालाय.

17:41 (IST) 2 Apr 2022
मुंबईकडून रोहित, इशान किशन सलामीला उतरले

१९४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईचा रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आलेले आहेत. सध्या मुंबईच्या १५ धावा झालेल्या आहेत.

17:22 (IST) 2 Apr 2022
मुंबई इंडियन्सला १९४ धावांचे आव्हान

राजस्थान रॉयल्सने वीस षटकांत १९३ धावा केल्या असून मुंबई इंडियन्ससमोर १९४ धावांचे आव्हान उभे केले आहे.

17:12 (IST) 2 Apr 2022
जोस बटलर १०० धावा करुन तंबुत परतला

राजस्थान रॉयल्सला जोस बटलरच्या रुपात मोठा झटका बसला आहे. बटरलने शतक झळकावले असून तो बाद झाला आहे.

17:10 (IST) 2 Apr 2022
शिमरॉन हेटमायर ३५ धावांवर बाद, राजस्थानला चौथा मोठा धक्का

राजस्थान रॉयल्सला चौथा मोठा धक्क बसला असून शिमरॉन हेटमायर ३५ धावांवर झेलबाद झाला आहे.

17:08 (IST) 2 Apr 2022
जोस बटलर तळपला, ६६ चेंडूंमध्ये झळकावले शतक

राजस्थानच्या जोस बटलरने धमाकेदार कागिरी केली असून त्याने या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने ६६ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या आहेत. बटलरच्या या धमाकेदार खेळानंतर सध्या राजस्थानच्या १८३ धावा झाल्या आहेत.

17:03 (IST) 2 Apr 2022
जोस बटलर, शेमरॉन हेटमायर यांची अर्धशतकी भागिदारी, राजस्थानच्या १८१ धावा

राजस्थान रॉयल्सचे जोस बटलर आणि शेमरॉन हेटमायर यांनी धमाकेदार खेळ दाखवला आहे. त्यांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. संध्या राजस्थान संघाच्या १८१ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाले आहेत.

16:42 (IST) 2 Apr 2022
राजस्थानला तिसरा मोठा धक्का, संजू सॅमसन ३० धावांवर झेलबाद

राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनच्या रुपात तिसरा धक्का बसला आहे. संजू सॅमसनने २१ चेंडूमध्ये ३० धावा केल्या. आपल्या या खेळामध्ये सॅमसनने तीन षटकार आणि एक षटकार लगावला.

16:27 (IST) 2 Apr 2022
बटलर, सॅमसन सुसाट, दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी

जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी मैदानावर आपली पकड मजबूत केली असून दोघेही मोठे फटके मारत आहेत. सध्या सॅमसन २१ धावांवर खेलत असून बटरलने ७६ धावांवर खेळत आहे. दोघांनीही अर्धशतकी भागिदारी केली आहे. सध्या राजस्थानच्या १०८ धावा झाल्या आहेत.

16:18 (IST) 2 Apr 2022
जोस बटलरचे अर्धशतक पूर्ण

जोस बटलर अप्रतिम फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक पूर्ण केले आहे. सध्या तो ५९ धावांवर खेळत असून तो चौकार आणि षटकार लगावत आहे.

16:09 (IST) 2 Apr 2022
राजस्थान रॉयल्सच्या ५३ धावा, संजू सॅमसन, बटलर फलंदाजीसाठी मैदानात

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ५३ धावा केल्या असून या संघाचे दोन गडी बाद झाले आहेत. सध्या मैदानात संजू सॅमसन आणि जोस बटलर फलंदाजी करत आहेत.

16:01 (IST) 2 Apr 2022
राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका, देवदत्त पडिक्कल बाद

राजस्थान रॉयल्सला दुसरा मोठा झटका बसला असून देवदत्त पडिक्कल अवघ्या सात धावा करुन बाद झालाय.

15:43 (IST) 2 Apr 2022
राजस्थानला पहिला झटका, यशस्वी यादव बाद

राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला असून यशस्वी यादव फक्त एक धाव करुन तंबुत परतला आहे. जसप्रित बुमराहने त्याचा बळी घेतला

15:19 (IST) 2 Apr 2022
राजस्थान रॉयल्सचे प्लेइंग इलेव्हन

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल

15:18 (IST) 2 Apr 2022
मुुंबई इंडियन्सचे प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थंंम्पी

15:16 (IST) 2 Apr 2022
मुंबई इंडियन्सने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader