मास्टर ब्लास्टर तसेच क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने संन्यास घेतलेला असला तरी तो नेहमीच चर्चेत असतो. आयपीएलमधील मुंबई संघाचा तो मार्गदर्शक आहे. सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु असल्यामुळे सचिन पुन्हा एकदा ठिकठिकाणी झळकतोय. दरम्यान सचिन तेंडुलकरचा पुण्याला जातानाचा एक खास व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने मराठी भाषेचे वेड पुन्हा समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर मराठीमध्ये गाणं गाताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या आयपीएलचे सामने सुरु असल्यामुळे सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी मार्गदर्शकाचे काम करतोय. मात्र मुंबईने आतापर्यंत दोन्ही सामने गमावलेले आहेत. या हंगामातील सामने पुणे आणि मुंबई येथे खेळवले जात आहेत. मुंबईचा पुढचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच कारणामुळे मुंबईच्या संघाला मार्गर्शन करण्यासाठी सचिन पुण्याला पोहोचला आहे.

हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान

दरम्यान कारने प्रवास असताना पुण्याच्या वाटेवर सचिनचे मराठीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. तो कारमध्ये ‘मी डलोकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ हे मराठमोळे गीत ऐकताना दिसतोय. विशेष म्हणजे आनंदी होऊन सचिन हे गीत गात आहे. हा पूर्ण क्षण त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सचिनचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच मराठमोळ्या सचिनचा हा अंदाज सर्वांनाच आवडला आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 | तिकडे आईवर रुग्णालयात उपचार, इकडे विजयासाठी मुलाची झुंज, लखनऊच्या आवेश खानला सलाम !

दरम्यान, या आयपीएलच्या हंगामात सचिन मार्गदर्शक असलेल्या मुंबईची सुरुवात काहीशी निराशाजनक झालेली आहे. मुंबईने आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावलेले असून मुंबई गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.