आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील प्रत्येक सामना अटीतटीचा होतोय. या हंगामात चौकार, षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडत असून क्रिकेट जगत तसेच सिनेसृष्टीतील बड्या व्यक्ती सामने पाहण्यासाठी येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत असलेल्या आजच्या सामन्यासाठी तर बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची सहमालक प्रीति झिंटाने हजेरी लावली. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ती पंजाब किंग्जला पाठिंबा देताना दिसली.

हेही वाचा >>> IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जसमोर नवं संकट, दिग्गज खेळाडू जखमी

आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर जायंट्स यांच्यातील लढतीदरम्यान प्रीति झिंटा पहिल्यांदाच प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसली. प्रेक्षक गॅलरीत दिसताच तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. विशेष म्हणजे पंजाब संघ सुरुवातीलाच फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यामुळे प्रीति झिंटा संघासाठी चिअर करताना दिसली. शिखर धवनने धमाकेदार अर्धशतक झळकावल्यानंतर तर प्रीति झिंटाने उभे राहत त्याचे अभिनंदन केले.

हेही वाचा >>> मुंबईच्या प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या, ट्विट करत रोहित शर्माने चाहत्यांना दिला खास संदेश, म्हणाला…

पंजाब किंग्जचे या हंगामामध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. मात्र यापैकी एकाही सामन्यात प्रीति झिंटा दिसली नाही. मात्र चेन्नईसोबतच्या सामन्यादरम्यान प्रीति प्रेक्षक गॅलरीत बसलेली दिसली. तिची उपस्थिती नेटकऱ्यांच्या नजरेतून चुकली नाही. प्रीति कॅमेऱ्यात कैद होताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिचे सामन्यातील फोटो अपलोड केले. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई यांच्यातील सामन्यापेक्षा प्रीति झिंटाचीच चर्चा जास्त झाली.

Story img Loader