IPL 2022 PBKS vs DC Playing XI : आयपीएलचे पंधरावे पर्व आता शेवकटाकडे जात आहे. सध्या प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी संघांकडून अटीतटीचे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यात आज मुंबई येथील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीवर सायंकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचायचे असेल तर दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आता आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> RR vs LSG : रियान परागच्या ‘या’ कृतीमुळे भडकले चाहते; जाणून घ्या नक्की काय झाले

गुणतालिकेचा विचार करायचा झाला तर सध्या दिल्ली कॅपिटल्स हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून या संघाने १२ पैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यांत या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जची स्थितीदेखील अशीच आहे. त्यामुळे प्लेऑफर्यंतच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?

सध्या पंजाब किंग्जच्या तुलनेत दिल्ली कॅपिटल्स हा संघ चांगल्या स्थितीत आहे. या संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ नुकताच विषमज्वरातून बरा झाला आहे. त्यामुळे हा खेळाडू आजच्या सामन्यात दिसणार का हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे संघामध्ये डेविड वॉर्न, मिशेल मार्श यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत. तसेच या संघाकडे ऋषभ पंत, रोवमन पॉवेल हे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले फलंदाजही आहेत. गोलंदाजी विभागात शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आजच्या सामन्यातही ते चांगली खेळी करतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> ऋतुराज गायकवाडने रचला ‘हा’ अनोखा विक्रम, अर्धशतक झळकावत सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

तर पंजाब संघाकडेही फलंदाजांची चांगली फळी आहे. या संघाकडे शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो असे तगडे फलंदाज आहेत. त्यामुळे हे आघाडीचे फलंदाज आजच्या सामन्यात चांगली खेळी करतील अशी अपेक्षा आहे. कसिगो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहल यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.

हेही वाचा >>> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

पंजाब किंग्ज संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

हेही वाचा >>> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

दिल्ली कॅपिटल्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएस भारत, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, रोवमन पॉवेल, रिपाल पटेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, चेतन सकारिया

Story img Loader