आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात पूर्ण ताकतीने लढा दिला. दरम्यान क्रिकेट आणि बॉलिवुड यांचं वेगळंच नातं आहे. क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी बॉलिवुड सेलिब्रिटी नेहमीच क्रिकेटच्या स्टेडियममध्ये येत असतात. कोलकाता आणि पंजाब यांच्यादरम्यानच्या सामन्याला तर स्टार्सकिड्सनी हजेरी लावली. आजच्या सामन्यात शाहरुख खानची मुलं सुहाना खान आणि आर्यन खान दिसले. तसेच अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेदेखील आर्यन आणि सुहाना यांच्यासोबत केकेआरला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.
आजच्या सामन्यादरम्यान आर्यन खान सुहाना खान तसेच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे झळकले. हे तिघेही प्रेक्षक गॅलरीत उभे राहत केकेआरला चिअर करत होते. केकेआरच्या सामना जिंकत असताना या स्टारकीड्सच्या चेहऱ्यावरली आनंद पाहण्यासारखा होता. त्यांची उपस्थिती जास्त वेळ लपून राहिली नाही. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, आजच्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सहा गडी राखून बाजी मारली. यावेळी कोलकाताचा फलंदाज आंद्रे रसेलने नेत्रदीपक कामगिरी केली. रसेलने नाबाद ७० धावा केल्या. तर गोलंदाजीमध्ये उमेश यादव पुन्हा एकदा चमकला. त्याने एकूण चार बळी घेतले. दोघांच्या या कामगिरीमुळे कोलकाताने पंजाबचा सहज पराभव केला.