आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील २३ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईवर बारा धावांनी मात केली आहे. तर मुंबईला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळाला नसून मुंबईला सलग पाचव्या पराभावला सामोरं जावं लागलं. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या धावांचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. नऊ गडी बाद होईपर्यंत मुंबई संघ १८६ धावा करु शकला.
पंजबाने दिलेल्या १९९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईने सुरुवातीपासून आक्रमक पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. इशान किशन अवघ्या तीन धावांवर झेलबाद झाला. तर रोहित शर्मा १७ चेंडूंमध्ये २८ धावा करुन झेलबाद झाला. त्यानंतर देवाल्ड ब्रेविस आणि तलक वर्माने मुंबईचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >> रोहित शर्माने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम नोंदवणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
देवाल्ड ब्रेविसने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत २५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३६ धावा केल्या. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने पंजाबशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. त्याने ४३ धावा केल्या. तर किरॉन पोलार्डला चांगली खेळी करता आली नाही. तो अवघ्या दहा धावांवर धावबाद झाला. जयदेव उनाडकटने फक्त बारा धावा केल्यामुळे मुंबईच्या आशा मावळल्या. जसप्रित बुमराह, टायमल मिल्स यांना खातदेखील खोलता आलेलं नाही.
हेही वाचा >> चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्याने केली कमाल, रचला ‘हा’ नवा विक्रम
यापूर्वी मुंबईने नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली. कर्णधार मयंक अग्रवालने अर्धशतकी खेळी करत ३२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकार लगावत ५२ धावा केल्या. त्यानंतर पंजाबच्या ९७ धावा झालेल्या असताना मयंक अग्रवाल झेलबाद झाला. त्यानंतर बेअरस्टोच्या रुपात पंजाबचा दुसरा गडी बाद झाला. बेअरस्टोने १२ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन चांगली खेळी करु शकला नाही. तो अवघ्या दोन धावा करुन त्रिफळाचित झाला.
हेही वाचा >> IPL ची मॅच राहिली बाजूला, भर मैदानात डेव्हिड वॉर्नरने केला ‘श्रीवल्ली’ डान्स
त्यानंतर सलामीला आलेला शिखर १७ व्या षटकामध्ये झेलबाद झाला. शिखर धवनने तुफान फटकेबाजी करत ५० चेंडूमध्ये पाच चौकार आणि तीन षटकार लगावत ७० धावा केल्या. धवनच्या या धावांमुळेच पंजबाला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. जितेश शर्मा आणि ओडेन स्मिथ नाबाद राहिले. जितेशने ३० थर ओडेन स्मिथने १ धाव केली. शाहरुख खान १५ धावांवर थंपीने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.
हेही वाचा >> कर्णधार म्हणून मिळालेला पहिला विजय जाडेजाने पत्नीला केला समर्पित, म्हणाला, माझ्या…
दुसरीकडे गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर पंजाबच्या गोलंदाजांनी सुरुवातीला मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळवले. मात्र देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ओडेन स्मीथने अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या तीन षटकात ३० धावा देत चार बळी घेतले. तर कसिगो रबाडाने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव अशा महत्त्वाच्या दोन फलंदाजांना तंबुत पाठवलं. वैभव अरोराने एक बळी घेतला.
हेही वाचा >> Video : माहीचा कूल अंदाज ! दोन कॅच सोडणाऱ्या मुकेश चौधरीला दिला दिलासा, खांद्यावर हात ठेवून…
मुंबईच्या गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांना रोखता आलं नाही. शिखऱ धवनने मुंबईच्या सर्वच गोलंदाजांची पिसं काढली. बसिल थंपीची गोलंदाजी मुंबईला महागात पडली. थंपीने चार षटकांत ४७ धावा दिल्या. मात्र थंपीने दोन बळीदेखील घेतले. उनाडकट, बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.