बंगळुरु आणि पंजाब यांच्यातील सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात बंगळुरुच संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र नेहमीप्रमाणे याही सामन्यात तो खास कामगिरी करु शकला नाही. २० धावांवर असताना विराट कोहली दुर्दैवी पद्धतीने बाद झाला आहे. डीआरएस घेऊनही विराटला जीवदान मिळाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> जॉनी बेअरस्टोपुढे बंगळुरुच्या गोलंदाजांनी टेकले हात, अवघ्या २१ चेंडूमध्ये झळकावले अर्धशतक

पंजाबने विजयासाठी दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या ३३ धावा झालेल्या असताना कसिगो रबाडाच्या चेंडूचा सामना करताना तो गोंधळला. फटका मारण्याचा प्रयत्न करताना चेंडू बॅटची किनार पकडून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. हात आणि चेंडूचा संपर्क आला नसल्याचे समजत पंचाने त्याला नाबाद दिले. मात्र पंजाबने डीआरएस घेत विराटला तंबुत पाठवलं. पंजाबने रिव्ह्यू घेत चेंडू नेमका कोठे लागला हे तापसण्याचे सांगितले. पण दुर्दैव म्हणजे रिव्ह्यूमध्ये विराटचा हात आणि चेंडूचा संपर्क झाल्याचे समोर आले आणि त्याला बाद देण्यात आले. विराटने आपल्या खेळीत एक षटकार आणि दोन चौकार लगावत २० धावा केल्या.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

दुसरीकडे पंजाब संघाने बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई करत वीस षटकात २०९ धावा केल्या. जॉनी बेअरस्टो तसेच लियाम लिव्हिंगस्टोन या दोन फलंदाजांनी अर्शतकी खेळी करत अनुक्रमे ६६ आणि ७० धावा केल्या. परिणामी पंजाबला २०० पेक्षा जास्त धावा करता आल्या.