आयपीएलच्या पंधराव्या हंगामीतल ५२ व्या सामन्यावर राजस्थान रॉयल्सने आपलं नाव कोरलं. पंजाब किंग्जने दिलेल्या १९० धावांचे लक्ष्य राजस्थानने सहा गडी राखून गाठले. या विजयासाठी फलंदाजीमध्ये यशस्वी जैसवाल आणि गोलंदाजी विभागात युझवेंद्र चहल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर दुसरीकडे पंजाब संघाकडून जॉनी बेअरस्टोने अर्धशतकी खेळी करुनही त्याचा उपयोग झाला नाही. पंजाबने वीस षटकांत १८९ धावा केल्या होत्या.

हेही वाचा >>>> IPL 2022, LSG vs KKR : लखनऊचे खेळाडू दिसणार नव्या रुपात! ‘मदर्स डे’च्या निमित्ताने परिधान करणार खास जर्सी

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Rabi season sowing is nearing completion with 632 27 lakh hectares sown by January 14
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड जाणून घ्या, देशातील रब्बी पेरण्यांची स्थिती, लागवड क्षेत्र
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
thrat note found bomb in plane from Goa to Mumbai alerting authorities mumbai print news sud 02
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी, गुन्हा दाखल

पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९० धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेल्या यशस्वी जैसवाल आणि जोस बटरलया जोडीने ४६ धावांची भागिदारी केली. जैसवालने ४१ चेंडूंमध्ये ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर जोस बटलरने ३० धावा करत राजस्थानला विजय सोपा करुन दिला. सलामीला आलेली ही जोडी बाद झाल्यानंतर संजू सॅमसन (२३), देवदत्त पडिक्कल (३१) आणि शिमरॉन हेटमायर (३१, नाबाद) या त्रिकुटाने राजस्थानला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>>>  IPL 2022 च्या पुढील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हिरव्या जर्सीत उतरणार, जाणून घ्या कारण

तर याआधी नाणेफेक जिंकून पंजाबने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबनेही सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत राजस्थानसमोर १८९ धावांचा डोंगर उभा केला. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने ४० चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. बेअरस्टोनंतर जितेश शर्मा वगळता अन्य एकही फलंदाजाला धावा करता आल्या नाही. धवनला फक्त १२ धावा करता आल्या. अश्विनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. तर भानुका राजपक्षेदेखील २७ धावांवर असताना युझवेंद्र चहलच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेला मयंक अग्रावालही फक्त १५ धावा करु शकला. जितेश शर्मा (३८), लियाम लिव्हिंगस्टोन (२२), ऋषी धवन यांनी समाधानकारक कामगिरी केली. मात्र मोठी धावसंख्या उभारुनही पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा >>>> युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे

गोलंदाजी विभागात राजस्थानच्या युझवेंद्र चहलने नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी करत तीन फलंदाजांना बाद केलं. तर रविचंद्रन अश्विन आणि प्रसिध कृष्णा या जोडीने प्रत्येकी एक बळी घेत चहलला साथ दिली. तर दुसरीकडे पंजाबचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. पंजाबला राजस्थानचे फक्त चार फलंदाज बाद करता आले. अर्षदीप सिंगने दोन तर कसिगो रबाडा आणि ऋषी धवन या जोडीने एक बळी घेतला.

Story img Loader