वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (४/२८) भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे सनरायजर्स हैदराबादने रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघावर सात गडी राखून मात केली. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२ मध्ये आपल्या गतीने दररोज नवा इतिहास लिहित आहे.

उमरानने रविवारी पंजाब किंग्जविरुद्धही नवा इतिहास रचला. सामन्याच्या पहिल्या डावातील २० व्या षटकात मेडन टाकणारा जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक आयपीएलमधील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही दिग्गजांना ही कामगिरी करता आलेली नाही. त्याने शेवटच्या षटकात चार विकेटही घेतल्या आहेत. उमरानच्या या ऐतिहासिक कामगिरीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs NZ Ahmed Shehzad's dissects India's loss vs New Zealand at Pune test match
IND vs NZ : ‘कागज के शेर घर में हुए ढेर…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
karan arjun salman and shah rukh khan blockbuster movie re releases
‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…
IND vs NZ Gautam Gambhir old video viral after India lost against New Zealand When he criticized Ravi Shastri
Gautam Gambhir : मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरचा ‘तो’ VIDEO व्हायरल, रवी शास्त्रींच्या वक्तव्यानंतर होतोय ट्रोल, काय आहे प्रकरण?
Aparshakti Khurana on brother Ayushmann Khurrana
“…तो आमच्या नात्याचा शेवट असेल”, आयुष्मान खुरानाच्या भावाचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी…”
chavadi nana patole future congress performance in maharastra assembly poll
चावडी : बिनधास्त नाना
India vs New Zealand Pune MCA Stadium Record is Scaring Team India Looms Danger over Test Defeat Read History
IND vs NZ: एकतर्फी पराभव किंवा मोठा विजय! पुण्यातील खेळपट्टीचा रेकॉर्ड टीम इंडियाला धडकी भरवणारा, नेमका काय आहे इतिहास?
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल

थरूर यांनी उमरान मलिकचे कौतुक करत म्हटले आहे की त्याला इंग्लंडला नेले पाहिजे कारण तो ब्रिटीशांना घाबरवेल. “आम्हाला त्याची भारतात लवकरात लवकर गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. तो हरवण्यापूर्वी त्याला मदत करा! ग्रीनटॉप कसोटी सामन्यासाठी त्याला इंग्लंडला घेऊन जा. तो आणि बुमराह एकत्र गोलंदाजी करुन इंग्रजांना घाबरवतील!” असे शशी थरूर यांनी ट्विट करून म्हटले आहे.

याआधी आयपीएलमध्ये २०व्या षटकात मेडन टाकण्याचा विक्रम इरफान पठाण आणि जयदेव उनाकट यांच्या नावावर होता. त्यांनी सामन्याच्या दुसऱ्या डावातील शेवटची षटक मेडन टाकले होते. मात्र उमरान मलिकने पहिल्या डावात मेडन ओव्हर टाकली होती. तर या षटकात एकूण चार विकेट पडल्या, त्यापैकी तीन विकेट उमरान मलिकच्या, तर एक विकेट रन आऊट होती. यामुळे पंजाब किंग्जचा धुव्वा उडाला.

दरम्यान, नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य हैदराबादने १८.५ षटकांत गाठत सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला कॅगिसो रबाडाने स्वस्तात माघारी पाठवले. मात्र, त्यानंतर डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२५ चेंडूंत ३१ धावा) आणि राहुल त्रिपाठी (२२ चेंडूंत ३४) यांनी ४८ धावांची भागीदारी रचत हैदराबादचा डाव सावरला. लेग-स्पिनर राहुल चहरने दोन षटकांच्या अंतराने या दोघांनाही बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु एडिन मार्करम (२७ चेंडूंत नाबाद ४१) आणि निकोलस पूरन (३० चेंडूंत नाबाद ३५) या अनुभवी परदेशी फलंदाजांनी ७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत हैदराबादला विजय मिळवून दिला.