आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २८ व्या सामन्यात पंजाब आणि हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर सात गडी राखून विजय मिळवला. पंजाबने दिलेले १५१ धावांचे लक्ष्य हैदराबादने एक षटक आणि एक चेंडू राखून गाठले. हैदराबादच्या ऐडन मरकराम आणि निकोलस पूरन या जोडीने नाबाद खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोनने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्याची मेहनत पाण्यात गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> IPL 2022, PBKS vs SRH : उमरान मलिक नावाच्या वादळात पंजाब नेस्तनाबूत, घेतल्या ६ चेंडूंमध्ये ४ विकेट्स!

पंजाबने दिलेल्या १५२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला केन विल्यम्सन रबाडाच्या चेंडूचा सामना करताना तीन धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या जोडीने संयमी खेळी केली. अभिषेक शर्माने २५ चेंडूमध्ये ३१ धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने २२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि एक षटकार लगावत ३४ धावा केल्या.

हेही वाचा >>> मयंक अग्रवाल जखमी होताच पंजाब किंग्ज संघात मोठा बदल, शिखर धवनकडे कर्णधारपद

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऐडन मरकराम आणि निकोलस पूरन ही जोडी संयमाने खेळ करत हैदरबादला विजयापर्यंत घेऊन गेली. ऐडन मरकरामने २७ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. तर निकोलस पूरनने ३० चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा केल्या. या जोडीने संयमाने खेळत हैदराबदच्या नावावर विजय नोंदवला.

हेही वाचा >>> IPL 2022 : बाद होताच त्रागा! मुंबईच्या इशन किशनने भर मैदानात काढला राग, कारवाई होणार ?

तर यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदरबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबाने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीला आलेली शिखर धवन आणि प्रभसिमरन ही जोडी चांगली खेळी करु शकली नाही. शिखर धवन जखमी झाल्यामुळे तो अवघ्या आठ धावा करुन झेलबाद झाला. तसेच प्रभसिमरन हादेखील फक्त १४ धावा करु शकला. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या बेअरस्टोने १२ धावा केल्या.

हेही वाचा >>> आरसीबीच्या दिनेश कार्तिकचं मोठं स्वप्न, म्हणतो “भारताला टी-२० विश्वचषक…”

त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने मात्र धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकार लगावत ६० धावा केल्या. त्याने केलेल्या या धावसंख्येमुळेच पंजाबला १५१ धावांपर्यंत मजल मारता आली. रितेश शर्मा ११ धावा करुन उमरान मलिकच्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला. तर शाहरुख खानने पंजाबला सावरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. त्याने २६ धावा केल्या. शाहरुख खाननंतर मात्र पंजाबचा एकही फलंदाज धावा करु शकला नाही.

हेही वाचा >>> “हा तर मरिन ड्राइव्ह आणि राजभवनापर्यंत षटकार मारतोय,” दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून बड्या व्यक्तीची प्रतिक्रिया

ओडेन स्मिथ १३ धावांवर असताना उमरान मलिकच्या चेंडूवर झेलबाज झाला. संघाच्या १५१ धावा झालेल्या असताना पंजाबचा अर्धा संघ बाद झाला. १५१ धावांनंतर पंजाबने एकही धाव न करता पाच गडी गमावले. शेवटच्या फळीतील रबाडा (०, नाबाद), राहुल चहर (०), वैभव अरोरा (०), अर्षदीप सिंग (०) या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली.

हेही वाचा >>> IPL 2022, MI vs LSG : सचिनच्या बाजुला बसला अर्जुन तेंडुलकर, सामन्यातील गुरु-शिष्याचे फोटो व्हायरल

हैदरबादच्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली. हैदराबादने जोराचा मारा केल्यामुळे पंजाब संघ फक्त १५१ धावा करु शकला. उमरान मलिकने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने चार विकेट्स घेतल्या. तर त्याने टाकलेल्या चेंडूवरच पंजाबचा एक गडी धावबाद झाला. शेवटच्या षटकामध्ये उमरानने पंजाबच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले. तर टी नटरजान आणि जे सुचिथ यांनी प्रत्येक एक बळी घेतला.