आयपीएलच्या पंधाराव्या पर्वात ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली. राजस्थानने विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य दिलेले असताना लखनऊ संघाला १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणमी राजस्थानचा २४ धावांनी विजय झाला. फलंदाजीमध्ये यशस्वी जैसवाल तर गोलंदाजी विभागात ट्रेंट बोल्ट आणि ओबेद मॅकॉय यांनी चांगला खेळ केल्यामुळे राजस्थानला विजयाची गोडी चाखता आली. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत लखनऊसोबत बरोबरी साधली.

हेही वाचा >>> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेल्या १७९ धावांचे लक्ष्य गाठताना लखनऊ संघाची सुरुवात फारच खराब झाली. लखनऊचे क्विंटन डी कॉक आणि आयुष बदोनी हे दोन्ही फलंदाज लागोपाठ बाद झाले. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर लखनऊची १५ धावांवर दोन गडी बाद अशी स्थिती झाली. त्यानंतर संघाच्या २९ धावा झालेल्या असताना कर्णधार केएल राहुलही झेलबाद झाला. ३० धावांच्या आत लखनऊचे तीन फलंदाज बाद झाल्यामुळे सुरुवातीला सामना पूर्णपणे राजस्थानकडे झुकला. त्यानंतर मात्र दीपक हुडा (59) आणि कृणाल पांड्या (२५) या जोडीने बचावात्मक खेळ केला. या जोडीने ६५ धावांची भागिदारी करत संघाला सांभाळले.

हेही वाचा >>>चेन्नईचा पुन्हा पराभव, सात गडी राखून गुजरातचा दणदणीत विजय; टायटन्सचे ‘टॉप टू’मधील स्थान पक्के

कृणाल पांड्या आणि दीपक हुडा ही जोडी बाद झाल्यानंतर मात्र लखनऊच्या विजयाच्या आशा मावळल्या. शेवटच्या फळीतील एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. जासोन होल्डरने एक धाव केली. तर दुषमंथा छमिरा खातंदेखील खोलू शकला नाही. परिणामी वीस षटकांमध्ये लखनऊ संघाला १५४ धावा करता आल्या आणि राजस्थानचा २४ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?

यापूर्वी नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानची सुरुवात खराब झाली. संघाच्या ११ धावा झालेल्या असताना सलामीला आलेला जोस बटरल अवघ्या दोन धावा करुन बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैसवाल (४१) आणि संजू सॅमसन (३२) या जोडीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने ६४ धावांची भागिदारी केली. त्यानंतर रियान पराग (१९) आणि देवदत्त पडिक्कल (३९) या जोडीनेही चांगली खेळी केली. या जोडीने २१ धावांची भागिदारी केली. मधल्या फळीतील आर अश्वीन आणि ट्रेंट बोल्ट या जोडीने अनुक्रमे नाबाद दहा आणि सतरा धावा केल्या. शेवटी २० षटकांत राजस्थान संघाने १७८ धावा केल्या.

हेही वाचा >>>ठरलं! महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे; २३ मेपासून रंगणार थरार

राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही नेत्रदीपक कामगिरी केली. ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय या तिघांनी प्रत्येक दोन फलंदाजांना बाद केले. तर युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केलं.

Story img Loader