हेरा फेरी हा चित्रपट सर्वांनाच आवडता आहे. विशेषत: मीमच्या दुनियेशी संबंधित लोकांसाठी, कारण सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित अनेक मीम्सचा बोलबाला आहे. या चित्रपटातील एका गाण्यावर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी डान्स करून हा प्रसंग रिक्रिएट केला आहे. राजस्थान रॉयल्सचे जिमी नीशम, ट्रेंट बोल्ट आणि डिरेल मिशेल हेरा फेरी चित्रपटातील ए मेरी जोहराजबीन गाण्यावर नाचताना दिसत आहेत. फिर हेरा फेरीमधील हा ऑर्केस्ट्रा पुन्हा राजस्थानच्या खेळाडूंनी समोर आणला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडियावर मजेशीर मीम्स आणि पोस्ट शेअर होत असतात. तसेच खेळाडूंसोबत असे प्रयोग करण्यात येतात. जिमी नीशम, ट्रेंट बोल्ट आणि डॅरेल मिशेल सतत सोशल मीडियावर असतात आणि आयपीएलच्या मध्यभागी या व्हिडीओमध्ये खोड्या करताना दिसत आहेत.
युझवेंद्र चहलनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे आणि शेअर करताना हा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सच्या स्टार्सचा हा व्हिडिओ ट्विटरवर खूप शेअर केला जात आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित मानले जाते. आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने १३ सामने खेळले आहेत आणि ८ जिंकले आहेत. तर पाच सामने गमावले आहेत. राजस्थान रॉयल्सने एक सामना जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. सामना जिंकला नाही तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे निश्चित मानले जाते.
आतापर्यंत प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्सचेच तिकीट निश्चित झाले आहे. लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स देखील प्लेऑफमध्ये पोहोचतील असे मानले जाते. शेवटच्या स्थानासाठी बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, पंजाबमध्ये शर्यत आहे.