IPL 2022 RCB vs CSK Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ वी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांकडे दिग्गज गोलंदाज आणि फलंदाजांची फौज असल्यामुळे आज नक्की कोणाचा विजय होणार याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे आजची लढत चांगलीच रंगतदार ठरणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> राहुल तेवतियाला राग अनावर, भर मैदनात साई सुदर्शनवर भडकला, पाहा व्हिडीओ

गुणतालिकेचा विचार करायचा झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंघुळुरु सध्या सहाव्या स्थानावर आहे. या संघाने एकूण दहा सामने खेळले असून बंगळुरुला पाच सामन्यांत पराभव तर पाच सामन्यांत विजय मिळाला आहे. त्यामुळे दहा गुण नावावर असलेल्या बंगळुरुला प्लेऑफपर्यंत मजल मारण्यासाठी पुढील काही सामने जिंकणे गरजेचे झाले आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज हा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानी आहे. या संघाने आतापर्यंत ९ सामने खेळलेले असून यापैकी फक्त ३ सामन्यांत या संघाला विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे प्लेऑफपर्यंत पोहोचायचे असेल तर चेन्नईला विजयी सातत्य ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा >>> ऋषी धवनला तोड नाही, डायरेक्ट हीट करून शुभमन गिलला केलं ‘असं’ बाद

मागील काही सामन्यांमध्ये बंगळुरु संघाला चांगली सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात सलामीला आलेले फलंदाज मोठी खेळी खेळतील अशी अपेक्षा आहे. हंगामाच्या सुरुवातीला कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंनी धमाकेदार फलंदाजी केली. फॉर्ममध्ये असलेले हे खेळाडू नंतर मात्र शांत झाले आहेत. आजच्या सामन्यात हे दोन खेळाडू चांगली फलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. तर विराट कोहलीला सध्या सूर गवसलेला आहे. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तो चांगल्या धावा करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> शाहरुख खानबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘तो खेळांडूसोबत…’

तर दुसरीकडे चेन्नई संघानेदेखील सध्या मरगळ झटकली असून मागील काही सामन्यांत चांगला खेळ करुन दाखवला आहे. या संघाने हैदराबादविरोधात दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामळे सध्या फॉर्ममध्ये असलेला हा संघ आजदेखील विजयापर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. चेन्नईचे कर्णधारपद पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे आले आहे. त्यामुळे रविंद्र जाडेजा दबाव झुगारुन पूर्ण क्षमतेने खेळी करण्याची शक्यता वर्तविली जातेय. ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन कॉन्वे या जोडीलाही आपला सूर पुन्हा एकदा गवसला आहे. त्यामुळे सध्या फॉर्ममध्ये असलेला हा संघ बंगळुरु संघाला चांगलीच टक्कर देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, ट्रेंट बोल्ट झाला असता गंभीर जखमी, पाहा KKR vs RR सामन्यात काय घडलं?

बंगळुरु संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

हेही वाचा >>> आयपीएलच्या अंतिम सामन्याचं ठिकाण ठरलं, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार थरार!

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार), रविंद्र जाडेजा, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग/ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, माहिश तिक्षाणा

हेही वाचा >>> “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण