गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुचा आठ गडी राखून दणदणीत विजय झाला. या विजयासह बंगळुरु संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा विजय झाल्यानंतर पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच दिल्लीला आपला पुढचा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकावा लागणार आहे. गुजरातने बंगळुरुसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर बंगळुरुने ही धावसंख्या आठ गडी राखून गाठली आणि सामन्यावर नाव कोरलं.

हेही वाचा >>> अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक

गुजरातने विजयासाठी दिलेल्या १६९ धावांचे लक्ष्य गाठताना सलामीला आलेल्या फॅफ डू प्लेसिस आणि विराट कोहली या जोडीने धमाकेदार खेळ केला. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत ५४ चेंडूमध्ये ८ चौकार आणि २ षटकार लगावत ७३ धावा केल्या. तर फॅफ डू प्लेसिसनेदेखील ३८ चेंडूंमध्ये ५ चौकार लगावत ४४ धावा केल्या. या जोडीने ११५ धावांची भागिदारी केली. दोघांच्या या खेळामुळे बंगळुरु संघ मजबूत स्थितीत पोहोचला.

हेही वाचा >>> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

फॅफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहलीला ग्लेम मॅक्सवेने साथ दिली. त्याने १८ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह बंगळुरु संघाची प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची आशा कायम आहे.

हेही वाचा >>> अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

यापूर्वी नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातचा हा निर्णय चुकीचा ठरला. संघाच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल फक्त १ धाव करुन तंबुत परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेडदेखील आपली कमाल दाखवू शकला नाही. तो ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर १६ धावांवर पायचित झाला. सलामीला आलेल्या वृद्धीमान साहाने समाधानकारक खेळी करत २२ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या.

हेही वाचा >>> रिंकू सिंहने सांगितली कठीण काळातील आठवण, म्हणाला ‘वडील २-३ दिवस जेवले नव्हते,’ कारण…

संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपली जबाबदारी चोख बजावत ६२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याला डेविड मिलर (३४) आणि राशिद खान (१९ नाबाद) या दोघांनी साथ दिली. राहुल तेवतीया मैदानावर टिकू शकला नाही. त्याने अवघ्या दोन धावा केल्या. शेवटी गुजरात टायटन्सने २० षटकांत १६८ धावा केल्या. मात्र बंगळुरु संघाने ही धावसंख्या गाठत गुजरातचा पराभव केला.

Story img Loader