RCB vs KKR : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने चांगलेच अटीतटीचे आणि चुरशीचे होत आहेत. आज या हंगामातील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. दरम्यान, आजचा सामना खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकतीनीशी मैदानावर उतरणार आहेत.

बंगळुरु आणि कोलकाता या दोन्ही संघाचे पहिले सामने चांगलेच चुरशीचे झाले. बंगळुरुचा पहिला सामना पंजाब किंग्जशी झाला. मात्र दोनशेपेक्षा जास्त धावा करु करुनही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. तर कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात काहीशी चांगली झाली असून या संघाने पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला चारी मुंड्या चित केलं होतं. त्यामुळे आज एकमेकांना भिडणाऱ्या दोन संघांपैकी बंगळुरुकडे आजचा सामना जिंकून विजयाचा श्रीगणेशा करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही विजयी सातत्य ठेवण्याचे आव्हान कोलकाता नाईट रायडर्ससमोर असणार आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस (क), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाश दीप, मोहम्मद सिराज

फाफ डू प्लेसिस, कोहलीसमोर सातत्य ठेवण्याचे आव्हान

आज होणाऱ्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे असून पहिल्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. फाफ डू प्लेलिसने ८८ धावा करत संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यास मदत केली होती. विराट कोहलीनेही ४१ धावा करत चांगला खेळ केला होता. मात्र गोलंदाजांच्या अपयशामुळे या संघाला पंजाबने पहिल्याच सामन्यात धूळ चारली होती. त्यामुळे यावेळी केकेआरला रोखून आजचा सामना जिंकण्याचे आव्हान बंगळुरुसमोर असेल.

कोलकाताचा विश्वास आणखी वाढला

तर दुसरीकडे केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत असून पहिल्याच सामन्यात विजय मिळाल्यामुळे या संघाचा विश्वास आणखी वाढला आहे. अजिंक्य रहाणे आणि अय्यर यांच्या कामगिरीवर या संघाचा विजय अवलंबून असेल. तसेच मधल्या फळीतील नितिश राणा, बिलिंग्ज, जॅक्सन या खेळाडूंकडेही मोठी जबाबदारी असेल. कोलकाताकडे शेल्डन जॅक्सन हा अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही संघाचे लक्ष्य राहणार आहे.

सामना कोठे आणि किती वाजता सुरु होणार ?

आजचा सामना नवी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी ठीक ७.३० वाजता खेळवला जाईल.

सामना कोठे पहता येईल ?

हा सामना स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर) तसेच disney plus hotstar वर पाहता येईल. या सामन्याचे सर्व अपडेट तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशियल वेसबाईटवरही भेटतील.

Story img Loader