आयपीएलचा १५ वा हंगाम चांगलाच चुरशीचा झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत योग्य ठरवला. यामध्ये तीन वर्षे क्रिकेटपासून दूर राहणारा आकाश दीप यांने तर नेत्रदीपक कामगिरी केलीय. त्याने चार षटकात ४५ धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाताचा पूर्ण संघ अवघ्या १२८ धावांवर बाद झाला. आकाश दीपच्या या कामगिरीमुळे तो आजच्या सामन्याचा किंग ठरतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तीन बळी घेऊन केकेआरला रोखलं

सामन्याच्या सुरुवातीला चौथे षटक सुरु असताना आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला अवघ्या दहा धावांवर बाद केले. या मोठ्या झटक्यामुळे कोलकाता संघ चांगलाच भेदरला. सिराज अहमदने टाकलेल्या चेंडूवर रहाणेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ९ धावांवर झेलबाद झाला. आकशी दापीने हा झेल पकडला. त्यानंतर कोलकाता संघ ४४ धावांवर असताना आकाश दीपने नितिश राणाचा बळी घेतला. राणा अवघ्या दहा धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र हसरंगाने त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या १३ धावांवर बाद केले.

आकाश दीप तीन वर्षे होता क्रिकेटपासून दूर

आकाश दीपने आयपीएल २०२२ मध्ये बंगळुरुकडून पदार्पण केले. दीप २५ वर्षीय असून त्याला २० लाख रुपयांना खरेदी करण्यात आलेले आहे. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी तो तीन वर्षे क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता त्याने पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत आजच्या सामन्यात आपली कमाल दाखवून दिलीय.