आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३१ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा १८ धावांनी विजय झाला. बंगळुरुने १८२ धावांचे लक्ष्य दिलेले असताना लखनऊ सुपर जायंट्स संघ १६३ धावा करु शकला. या विजयासाठी बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने महत्त्वाची भूमिका बजावली. तर बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली मात्र शून्यावर बाद झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >> IPL 2022, RCB s LSG : विराटला नेमकं काय झालंय ? पहिल्याच चेंडूवर शून्यावर झेलबाद
बंगळुरुने दिलेले १८२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या लखनऊची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला क्विंटन डी कॉक तिसऱ्याच षटकावर झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मनिष पांडेदेखील (६) पाचव्या षटकावर स्वस्तात झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पांड्या या जोडीने लखनऊला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ३१ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा >> वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची शक्यता, बीसीसीआयची निवड समिती करतेय गंभीर विचार
केएल राहुल ३० धावा करुन झेलबाद झाल्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुडा (१३) यांनी ३१ धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत घेऊ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कृणाल पांड्या (४२) ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर झेलबाद झाल्यानंतर लखनऊचा एकही खेळाडू मैदानात तग धरू शकला नाही. अयुष बदोनी हेझलवूडच्या चेंडूचा सामना करताना १३ धावांवर बाद झाला.
हेही वाचा >> RR vs KKR : पती युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं भन्नाट सेलिब्रेशन, प्रेक्षक गॅलरीतील व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर मात्र मार्कस स्टीओनीस बगळता खालच्या फळीतील फलंदाज चांगली धावसंख्या करू शकले नाहीत. मार्कसने २४ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात ३१ धावांची गरज असल्यामुळे अशक्य वाटणारे हे लक्ष्य गाठण्यासाठी जासोन होल्डर (१६) आणि दुशमंथा छमिरा यांनी प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. वीस षटकांमध्ये लखनऊ संघ १६३ धावा करु शकला.
हेही वाचा >> PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार
याआधी लखनऊने नाणेफक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरुचे अनुज रावत आणि फॅफ डू प्लेसिस फलंदाजीसाठी सलामीला आले. मात्र बंगळरुची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात बंगळुरुचे दोन गडी बाद झाले. अनुज रावत चार धावा करुन झेलबाद झाला. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला विराट कोहली एकही धाव न करता शून्यावर झेलबाद झाला. पहिल्याच षटकात दोन फलंदाज तंबुत परतल्यामुळे बंगळुरु संघावर सुरुवातीला दबाव वाढला. मात्र सलामीला आलेला फॅफ डू प्लेलिसने मैदानावर पाय रोवत लखनऊच्या गोलंदाजांची धुलाई केली.
हेही वाचा >> KKR vs RR : प्रसिद्ध कृष्णा आणि अॅरॉन फिंच यांच्यात बाचाबाची; व्हिडीओ व्हायरल
सलामीला आलेल्या फॅफ डू प्लेसिसने आयपीएलच्या त्याच्या शंभराव्या सामन्यात ९६ धावा केल्या. ६४ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि दोन षटकार लगवात त्याने ही धावसंख्या उभारली. त्यानंतर ग्ल्ने मॅक्सवेल (२३), सुयस प्रभुदेसाई (१०), शाहबाज अहमद (२६) यांनी डू प्लेसिसला साथ देत बंगळुरुला १८१ धावांपर्यंत पोहोचवलं. दिनेश कार्तिकने आठ चेंडूंमध्ये नाबाद १३ धावा केल्या.
हेही वाचा >> IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरकडे ऑरेंज कॅप कायम; धावसंख्येचा आसपास कोणीही नाही
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फॅफ डू प्लेसिसने फलंदाजीमध्ये तर जोश हेझलवूडने गोलंदाजीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. हेझलवूडने चार षटकात २२ धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्याने क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, आयुष बदोनी अशा आघाडीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा >> Yuzvendra Chahal’s Hat-Trick : हॅटट्रीकनंतर युझवेंद्र चहलने मैदानावर दिली ‘ती’ खास पोझ; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दुसरीकडे लखनऊच्या संघाच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फॅफ डू प्लेसिससह अन्य फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. लखनऊचे गोलंदाज वीस षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फक्त सहा गडी बाद करु शकले. छमिरा, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर कृणाल पांड्याने एका फलंदाजाला बाद केले.