IPL 2022, RCB vs MI Highlights: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १८ वा सामना पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असून दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईला या हंगामात आतापर्यंत एकही विजय मिळालेला नसल्यामुळे हा संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तीनपैकी दोन सामन्यांत विजय नोंदवलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates
23:22 (IST) 9 Apr 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दणदणीत विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून मुंबईचा पराभव झालेला आहे. मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे.

23:08 (IST) 9 Apr 2022
बंगळुरुला दुसरा मोठा झटका, अनुज रावत ६६ धावांवर धावबाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसरा मोठा झटका बसला असून अनुज रावत धावबाद झाला आहे. त्याने ६६ धावा केल्या असून रमणदीप सिंगने त्याला धावबाद केले.

22:51 (IST) 9 Apr 2022
बंगळुरुच्या १०६ धावा, मुंबई दुसऱ्या विकेटच्या शोधात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १०० धावा पूर्ण झाल्या असून अजूनही मुंबई संघ दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे. सध्या विराट कोहली आणि अनुज रावत फलंदाजी करत आहेत.

22:49 (IST) 9 Apr 2022
मुंबई दुसऱ्या विकेटच्या शोधात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे विराट कोहली आणि अनुज रावत मैदानात पाय रोवून उभे असून मुंबई सध्या दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे. विराट कोहली सध्या १८ धावांवर खेळत असून अनुज रावत ४८ धावांवर फलंदाजी करत आहे.

22:21 (IST) 9 Apr 2022
बंगळुरुला पहिला झटका, फाफ डू प्लेलिस १६ धावांवर बाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला झटका बसला असून कर्णधार फाफ डू प्लेलिस १६ धावांवर बाद झाला आहे.

21:56 (IST) 9 Apr 2022
फाफ डू प्लेलिस- अनुज रावत सलामीला मैदानात, मुंबई संघ विकेटच्या शोधात

बंगळुरु संघाचे फाफ डू प्लेलिस आणि अनुज रावत सलामीला मैदानात उतरले आहेत. या दोघांनी चांगली सुरुवात केली असून मुंबई संघ सध्या विकेटच्या शोधात आहे.

21:26 (IST) 9 Apr 2022
सूर्यकुमार तळपला, बंगळुला १५२ धावांचे आव्हान

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे मुंबईने बंगळुरुसमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सूर्यकुमारने ६८ धावा केल्या.

21:19 (IST) 9 Apr 2022
सूर्यकुमार यादवचा अर्धशतकी खेळ, मुबंबईच्या १४४ धावा

सूर्यकुमार यादव उत्तम फलंदाजी करत असून त्याने अर्धशतकी खेळ खेला आहे. त्याच्या सध्या ५६ धावा झाल्या आहेत. तो मोठे फटके मारत चौकार तसेच षटकार लगावत आहे.

21:13 (IST) 9 Apr 2022
सूर्यकुमार यादवची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईच्या १२७ धावा

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने आपले पाय मैदानात रोवले आहेत. सूर्यकुमार सध्या मोठे फटके लगावत असून तो सध्या ४७ धावांवर खेळत आहे. मुंबई इंडियन्सच्या सध्या १२७ धावा झाल्या आहेत.

20:48 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सच्या ८० धावा, उनाडकट- सूर्यकुमार यादव जोडी फलंदाजीसाठी मैदानात

मुंबई इंडियन्सच्या सध्या ८० धावा झाल्या असून एकूण ६ गडी बाद झाले आहेत. सध्या मैदानात सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट फलंदाजी करत आहेत.

20:46 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका, रमणदीप सिंग सहा धावांवर झेलबाद

मुंबई इंडियन्सला रमणदीप सिंगच्या माध्यमातून सहावा मोठा झटका बसला आहे. रमणदीप सिंग अवघ्या सहा धावा करुन तंबुत परतलाय.नपऊ

20:31 (IST) 9 Apr 2022
मुंबईची परिस्थिती बिकट, ६२ धावांवर पाच गडी बाद

मुंबईला पाचवा मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा दिग्गज फलंदाज किरॉन पोलार्ड शून्यावर पायचित झाला आहे. या विकेटनंतर आता मुंबईची स्थिती ६२ धावांवर पाच गडी बाद अशी झाली आहे.

20:27 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सला चौथा मोठा झटका, चोरटी धाव घेताना तिलक वर्मा धावबाद

मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपात चौथा मोठा धक्का बसला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा बाद झाला.

20:24 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका, इशान किशन झेलबाद

मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. इशान किशन २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.

20:17 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका, देवाल्ड ब्रेविस पायचित

मुंबई इंडियन्सला देवाल्ड ब्रेविसच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला असून. हसरंगाच्या चेंडूवर तो पायचित झाला.

20:05 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका बसला असून रोहित २६ धावांवर झेल बाद झाला आहे. गोलंदाज हर्षल पटेलनेच रोहितचा झेल टिपला आहे. रोहितनंतर आता देवाल्ड ब्रेविस फलंदाजीसाठी उतरला आहे.

20:02 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सच्या ५० धावा पूर्ण

इशान किशन आणि रोहित शर्मा या जोडीने मैदानावर चांगल्या प्रकारे पाय रोवले असून मुंबईच्या आतापर्यंत ५० धावा झालेल्आ आहेत. रोहित शर्मा २६ धावांवर खेळत असून इशान किशनच्या २३ धावा झाल्या आहेत.

19:54 (IST) 9 Apr 2022
इशान किशनच्या २१ धावा, रोहित शर्माच्या २० धावा

इशान किशनच्या सध्या २१ धावा झालेल्या असून रोहित शर्मा २० धावांवर फलंदाजी करत आहे.

19:53 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्सकडून इशान किशन- रोहित शर्मा सलामीला

मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली असून इशन किशन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला उतरली आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या ३७ धावा झाल्या आहेत.

19:26 (IST) 9 Apr 2022
मुंबई इंडियन्स संघाचा प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी

19:24 (IST) 9 Apr 2022
बंगळुरु संघाचा प्लेइंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

19:23 (IST) 9 Apr 2022
बंगळुरचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्याला काही क्षणांत सुरुवात होणार असून बंगळुरु संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.