आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा जोस बटलर सध्या फूल फॉर्ममध्ये दिसतोय. प्रत्येक सामन्यात तो धावांचा पाऊस पाडतोय. त्याने या हंगामात आतापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत. आज मात्र त्याची जादू चालू शकली नाही. गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या जोस बटलरने बंगळुरुच्या जोश हेजलवूडसमोर हात टेकले आहेत. हेजलवूडने बटलरला अवघ्या आठ धावांवर तंबुत पाठवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा! डोक्याला खास फेटा बांधून झळकले वानखेडे स्टेडियमवर, पोस्टरचीही होतेय विशेष चर्चा

आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टॉपच्या दोन संघांमध्ये जाण्यासाठी राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकण्यासाठी धडपडतोय. तर गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या बंगळुरुला टॉपच्या चार संघांमध्ये येण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने टॉपचा फलंदाज जोस बटलर याला फलंदाजीसाठी सलामीला पाठवले होते. नेहमीप्रमाणे यावेळीदेखील बटलर गोलंदाजांची धुलाई करेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र बंगळुरुच्या जोश हेजलवूडसमोर त्याने हात टेकले. बटलर अवघ्या आठ धावांवर खेळत असताना हेजलवूडने त्याला झेलबाद केलंय.

हेही वाचा >> प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर बटलरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूची गती आणि उंची समजू न शकल्यामुळे तो चुकला. ज्यामुळे बटलरने मारलेल्या फटक्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. परिणामी बटलरला अवघ्या आठ धावांवर तबुत परतावे लागले. बटलरला दहा चेंडूदेखील खेळता आले नाहीत. यापूर्वी बटलरने तीन शतकं झळकावली आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या सामन्यात ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तर कोलकाता नाईट रायडर्सविरोधात खेळताना बटलरने ६१ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या होत्या.