आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३९ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन तूल्यबळ संघांमध्ये खेळवला जातोय. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असल्यामुळे राजस्थान आणि बंगळुरु संघ पूर्ण ताकतीने लढा देत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आजच्या सामन्यात मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असताना तो अवघ्या २७ धावांवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे फटका मारताना गोंधळ उडाल्यामळे तो त्रिफळाचित झालाय.

हेही वाचा >> RCB vs RR : बंगळुरुच्या ‘जोश’समोर राजस्थानच्या ‘जोस’ने टेकले हात, फूल फॉर्ममध्ये असताना बटलर ‘असा’ झाला बाद

Akash Deep was bought by LSG and Mukesh Kumar by DC for 8 crores each in IPL 2025 Auction
IPL 2025 Auction : आयपीएल लिलावात ‘बिहारी बाबू’ मालामाल! मुकेश कुमार आणि आकाश दीपवर लागली करोडोंची बोली
Allah Ghazanfar sold to Mumbai Indians more than 4 crore ipl 2025 mega auction
Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय…
Deepak Chahar Bought By Mumbai Indians more than 9 crore in IPL 2025 Auction
Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस
Bhuvneshwar Kumar with RCB in IPL 2025
Bhuvneshwar Kumar IPL 2025 Auction : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी
IPL Auction 2025 Day 2 Live Updates in Marathi
IPL Mega Auction 2025 Live Updates: सर्फराझ खान अनसोल्ड, पण भाऊ मुशीर खान ‘या’ आयपीएल संघाचा भाग
Ipl 2025 Auction All 10 Teams Purse Remaining And Slots Available After Day 1 RCB MI PBKS With Most Money
IPL Auction 2025: IPL लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? RCB आणि MI ला अजूनही १६ खेळाडूंची गरज
IPL 2025 Auction: Which Teams Got Their Captains on 1st Day of Mega Auction?
IPL Auction 2025: पहिल्याच दिवशी ‘या’ ४ संघांना मिळाला कर्णधार, तीन खेळाडू ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
Mumbai Indians Bought Trent Boult with 12 05 crores in IPL Auction 2025
Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

सलामीला आलेले जोस बटरल आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या विकेटसाठी आलेला रविचंद्रन अश्विन फक्त १७ धावा करु शकला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन धडाकेबाज खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो मैदानावर जास्त काळासाठी तग धरू शकला नाही. त्याने २१ चेंडूंमध्ये १ चौकार आणि तीन षटकार लगावत २७ धावा केल्या.

हेही वाचा >> प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर संजू सॅमसन थेट त्रिफळाचित झाला आहे. वनिंदूच्या चेंडूचा सामना करताना संजू गोंधळला. त्याने बचावात्मक पवित्रा घेत मोठा फटका मारण्याचे टाळले. ऐनवेळी चेंडूने वळण घेतले आणि संजूचा थेट त्रिफळा उडाला. संजू अशा पद्धतीने बाद होईल अशी कोणालाही कल्पना नव्हती त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे चाहते नाराज झाले.

हेही वाचा >> कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा! डोक्याला खास फेटा बांधून झळकले वानखेडे स्टेडियमवर, पोस्टरचीही होतेय विशेष चर्चा

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने वीस षटकात आठ गडी गमवत १४४ धावा केल्या. यामध्ये रियान परागने दिमाखदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. तर संजू सॅमसनने २७ धावा केल्या. सलामीचे जोस बटरल (८) आणि देवदत्त पडिक्कल (७) धावांवर झेलबाद झाले.