आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १३ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठऱला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या या सामन्यात बंगळुरुचा विजय झाला. या विजयासाठी दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानकडून विजय खेचून आणला. दरम्यान या रंगतदार सामन्यानंतर बंगळुरु संघाने जबरदस्त सेलिब्रेशन केलंय. या ग्रँड सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> Video : युजवेंद्रचा खेळ पाहून आनंद गगनात मावेना, पत्नी धनश्री वर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा, स्टेडीयममधील व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये बंगळुरुचा पूर्ण संघ विजयोत्सव साजरा करताना दिसतोय. कर्णधार फाफ डू प्लेलीस तर बंगळुरुचे गाणे गात आहे. त्याच्यासोबत संघातील इतर खेळाडू तसेच प्रशिक्षकदेखील गाताना दिसत आहेत. हा विजयोत्सव पाहून बंगळुरुचे चाहते भारावून गेले आहेत. दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीला या विजयाचे शिलेदार म्हटलं जातंय. कारण संघाची परिस्थिती बिकट असताना कार्तिकने ४४ धावा आणि शाहबाज अहमदने ४५ धावांची खेळी केली. त्यांच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळेच बंगळुरुला विजयापर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा >>>> संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

दरम्यान, हा विजय बंगळुरुला सहजासहजी मिळालेला नाही. राजस्थानने दिलेले १७० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची चांगलीच धांदल उडाली होती. संघाच्या ९० धावा असताना बंगळुरुचा अर्धा संघ तंबुत परतला होता. राजस्थानच्या युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. असे असले तरी शेवटी दिनेश कार्तिक आपली भूमिका चोखपणे बजावत बंगळुरुला विजयापर्यंत घेऊन गेला.