राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रोमहर्षक लढत झाली. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने संघात मोठे बदल केले. विशेष म्हणजे कोहली सतत खराब खेळी करत असल्यामुळे त्याला फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले. मात्र यावेळीदेखील त्याने आपल्या खराब खेळात सुधारणा केली नाही. मागील दोन सामन्यांत गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर आजच्या सामन्यातही कोहली अवघ्या ९ धावांवर झेलबाद झाला. आहे. दुसऱ्याच षटकात राजस्थानच्या वनिंदू हसरंगाने त्याला तंबुत पाठवलंय.

हेही वाचा >> RCB vs RR : फलंदाजी करताना संजू सॅमसन गोंधळला, वनिंदू हसरंगाच्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार ‘क्लीन बोल्ड’ !

आजचा सामना जिंगणे गरजेचे असल्यामुळे बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने अनुज रावतला बाहेर ठेवत रजत पाटीदारला संघात स्थान दिले. त्यानंतर त्याने विराट कोहलीची फलंदाजीसाठीची जागा बदलत त्याला थेट ओपनींगला पाठवले. मागील दोन्ही सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झालेला आहे. त्यामुळे सलामीला जाऊन कोहली आक्रमक फलंदाजी करेल अशी अपेक्षा फॅफ डू प्लेसिसला होती. मात्र कोहलीने अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केली नाही. त्याने दहा चेंडूमध्ये फक्त ९ धावा केल्या. दुसऱ्याच षटकात तो झेलबाद झाला. वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू रियान परागच्या हातात विसावल्यामुळे कोहलीला तंबुत परतावं लागलं.

हेही वाचा >> कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा! डोक्याला खास फेटा बांधून झळकले वानखेडे स्टेडियमवर, पोस्टरचीही होतेय विशेष चर्चा

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोहलीने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने याआधीच्या आठ सामन्यांत फक्त ११९ धावा केल्या आहेत. याआधीच्या दोन्ही सामन्यांत तो गोल्डन डकवर शून्यावर बाद झाला आहे. त्यानतंर आजच्या सामन्यातही कोहलीला खास कामगिरी करता आलेली नाही.

Story img Loader