IPL 2022, RCB vs SRH Match Updates : टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderabad) झाला. हैदराबादने तब्बल ९ विकेटने बंगळुरूला पराभूत केलं. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सनरायजर्स हैदराबादने या हंगामात आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. या विजयासह गुणतालिकेत हैदराबाद पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. बंगळुरूचा संघ या पराभवासह आयपीएल २०२२ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेला.

आयपीएलच्या इतिहासात बंगळुरू आणि हैदराबादमध्ये आतापर्यंत २० सामने झालेत. यात सनरायजर्स हैदराबादने ११ आणि आरसीबीने ८ सामने जिंकले. एक सामना रद्द झाला होता. भारतात दोन्ही संघात १६ सामने खेळले गेले. त्यातील हैदराबादने ८ आणि आरसीबीने ७ सामने जिंकले. एक सामना रद्द झाला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इनिंग

बंगळुरूकडून सुयश प्रभुदेसाईने २० चेंडूत १५ धावा केल्या. यात त्याच्या एका चौकाराचा समावेश आहे. या सामन्यात १५ ही बंगळुरूच्या फलंदाजांपैकी सर्वाधिक धावसंख्या ठरली. यानंतर ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक येतो. त्याने ११ चेंडूत १२ धावा केल्या. त्यात मॅक्सवेलच्या २ चौकारांचा समावेश आहे. बंगळुरूच्या संघात प्रभुदेसाई आणि मॅक्सवेललाच दोन अंकी धावा काढता आल्या. इतर सर्व खेळाडू एकअंकी धावा काढत बाद झाले.

कर्णधार डु प्लेसिस ५ धावा (७ चेंडू), अनुज रावत ० धावा (२ चेंडू), विराट कोहली ० धावा (१ चेंडू), शाहबाज अहमद ७ धावा (१२ चेंडू), दिनेश कार्तिक ० धावा (३ चेंडू), हर्षल पटेल ४ धावा (८ चेंडू), वानिंदु हसरंगा ८ धावा (१९ चेंडू) आणि मोहम्मद सिराज २ धावा (४ चेंडू) करून बाद झाले. जोश हेजलवुड ११ चेंडूत ३ धावा करून नाबाद राहिले.

सनरायजर्स हैदराबाद इनिंग

बंगळुरूकडून मिळालेल्या ६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियमसनने सलामी खेळी केली. यावेळी अभिषेकने २८ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने दमदार ४७ धावांची खेळी केली. केन विलियमसनने १७ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. यात त्याच्या २ चौकारांचा समावेश आहे. राहुल त्रिपाठीने ३ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या. यात त्याच्या एका षटकाराचा समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेईंग इलेव्हन

अनुज रावत, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज

हेही वाचा : हार्दिक पांड्याकडून अर्धशतकांची हॅट्रिक, आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन