आयपीएलच्या पंधराव्या हंगामामधील २३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन तगड्या संघांमध्ये खेळवला जातोय. पंजबाने मुंबईसमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान ठेवले असून ही धावसंख्या गाठण्यासाठी मुंबई पूर्ण ताकतीने प्रयत्न करतोय. दरम्यान या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीमध्ये चमकला नसला तरी त्याने मोठा विक्रम नोंदवला आहे.
हेही वाचा > IPL 2022 : हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, आकाश दीप झाला शून्यावर बाद, अंबाती रायडूची एकच चर्चा
रोहित शर्मा एक दिग्गज फलंदाज असून त्याच्या नावावर आतापर्यंत अनेक विक्रम आहेत. आजच्या सामन्यात रोहितच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेलाय. टी-२० क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठऱला आहे. याआधी विराट कोहलीने असा विक्रम नोंदवलेला आहे.
हेही वाचा >>> Video : माहीचा कूल अंदाज ! दोन कॅच सोडणाऱ्या मुकेश चौधरीला दिला दिलासा, खांद्यावर हात ठेवून…
रोहित शर्माने या सामन्यात १७ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने २८ धावा केल्या. तर सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबने मुंबईसमोर १९८ धावांचे लक्ष्य ठेवले. पंजाबच्या मयंक अग्रवाल आणि शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी करत ही धावसंख्या उभारली.