आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात आता आणखी एक अष्टपैलू खेळाडू सामील झाला आहे. लग्न आटोपून मूळचा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल लगेच भारतात आला आहे. मॅक्सवेल बंगळुरुचा हुकमी एक्का आहे. त्यामुळे तो कधी एकदा संघात सामील होतो याची बंगळुरुचे चाहते वाट पाहत होते. दरम्यान तीन दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन तो मैदानावर खेळायला येणार आहे.

मॅक्सवेल त्याचा पहिला सामना कधी खेळणार ?

ग्लेन मॅक्सवेलने विनी रमणशी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. या लग्नामुळे मॅक्सवेल अद्याप बंगळुरु संघात सामील झाला नव्हता. या काळात बंगळुरुचे अनेक चाहते त्याच्या उपस्थितीबद्दल विचारत होते. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून म तीन दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन संघात सामील होणार आहे. तशी माहिती बंगळुरुने दिलीय. मॅक्सवेल १ एप्रिल रोजी भारतात आला आहे. तो तीन दिवसांचा कालावधी पूर्ण करुन चार एप्रिल रोजी सराव करायला मैदानात उतरणार आहे. येत्या ५ एप्रिल रोजी बंगळुरुची लढत राजस्थान रॉयलशी असेल. मात्र ऑस्टेलियन क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रिलियाचे खेळाडू ५ एप्रिलनंतरच आयपीएलमध्ये सामील होतील अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे मॅक्सवेल ५ एप्रिलचा सामना खेळू शकणार नाही. तर तो ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात प्रत्यक्ष मैदानावर उतरणार आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत दोन सामने खेळले असून पंजाबविरोधातील सामना गमावलेला आहे. तर कोलकाताविरोधात झालेल्या लढतीत बंगळुरुने विजय मिळवलेला आहे. त्यात आता मॅक्सवेल हा अष्टपैलू खेळाडू संघात सामील झाल्यामुळे बंगळुरुचे बळ वाढणार आहे.

Story img Loader