आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यात विजय संपादन करुन प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा राजस्थान रॉयल्सचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे चेन्नई संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. हा संघ याआधीच प्लेऑफच्या बाहेर पडलेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय संपादन करुन राजस्थानचा विजयी रथ रोखण्याचा चेन्नई संघाचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

गुणतालिकेबाबत बोलायचं झालं चेन्नई सुपर किंग्ज हा संघ नवव्या स्थानी आहे. हा संघ याआधीच प्लेऑफच्या शर्यतीच्या बाहेर पडलेला आहे. त्यामुळे या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही. याच कारणामुळे हा संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे. तर राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज विजय नोंदवत हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. आजचा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला तर हा संघ गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमके काय होणार? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

हेही वाचा >>> गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात

राजस्थान रॉयल्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅक्कॉय

हेही वाचा >>> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, शिवम दुबे, एन जगदीसन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, मथिशा पथिराना, मुकेश चौधरी

Story img Loader