राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजीसाठी येत मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. कर्णधार हार्दिक पांड्याने तर कर्णधार म्हणून आपली भूमिका चोख बजावली असून धडाकेबाज अशी नाबाद ८७ धावांची खेळी केली आहे. त्याने केलेल्या धावांच्या जोरावरच गुजरात टायटन्सने राजस्थानसमोर १९२ धावांचा डोंगर उभा केला आहे.
हेही वाचा >>> IPL 2022, RRvsGT : रासी ड्यूसेनचा डायरेक्ट हीट! मॅथ्यू वेडला केलं बघता बघता धावबाद
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून सलामीला आलेल्या मॅथ्यू वेड आणि शुभमन गिलने निराशा केली. मॅथ्यू वेड अवघ्या १२ धावांवर असताना व्हॅन डर ड्यूसेनच्या डायरेक्ट हीटवर धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला विजय शंकरदेखील अवघ्या दोन धावांवर कुलदीप सेनने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी केली. त्याने मैदानावर पाय रोवून चार षटकार आणि आठ चौकार लगावत नाबाद ८७ धावा केल्या. संघाची ५३ धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती असताना हार्दिकने संयम राखत वेळ मिळताच मोठे फटके मारले.
हेही वाचा >>> ‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?
दरम्यान, अभिनव मनोहर आण डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली. अभिनवने २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर डेविड मिलरने १४ चेंडूंमध्ये एक षटकार आणि पाच चौकार लगावत नाबाद ३१ धावा केल्या. वीस षटकांत गुजरातने १९२ धावा केल्या असून मुंबईला विजयासाठी १९३ धावा कराव्या लागणार आहेत.