राजस्थान रॉयल्सचा पहिला रॉयल खेळाडू कोण असेल तर ते नाव ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न आहे. आयपीएलचा पहिला हंगाम जिंकणारा राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचा पहिला रॉयल खेळाडू म्हणून शेन वॉर्नकडे नेहमीच पाहिले जाते. आयपीएलचा पहिल्या हंगामाच शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संघाचा भाग आहे. मात्र, या वर्षी मार्चच्या सुरुवातीलाच त्यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्स त्यांच्या पहिल्या रॉयल खेळाडूला श्रद्धांजली वाहणार आहे.

शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी, राजस्थान रॉयल्सने एक विशेष किट जारी केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या प्रत्येक खेळाडूच्या कॉलरवर SW23 लिहिलेले दिसेल. SW म्हणजे शेन वॉर्न आणि तो नेहमी २३ नंबरची जर्सी घालत होता. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही, तर ज्या ज्या पद्धतीच्या क्रिकेटमध्ये तो खेळला आहे, त्याचा जर्सी क्रमांक २३ हाच होता. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सच्या जर्सीच्या कॉलरवर SW23 लिहिलेले असेल. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ही जर्सी घालून संघ उतरणा आहे. हा संपूर्ण सामना शेन वॉर्नला समर्पित असेल.

तर आजच्या सामन्यात प्रतिस्पर्धी असणाऱ्या मुंबई इंडियन्सनेही शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट करत हॅशटॅग वॉर्नीसाठी असे म्हटले आहे. यासोबत शेन वॉर्नचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

शेन वॉर्न २००८ ते २०११ पर्यंत राजस्थान संघाचा भाग होता. चार वर्षांत त्याने संघासाठी ५५ सामने खेळले. यामध्ये त्याने ५७ विकेट्स घेतल्या. तेव्हापासून ते संघाशी कधी मार्गदर्शक, कधी प्रशिक्षक तर कधी आयकॉन म्हणून जोडला गेला होता. मार्चमध्ये त्याचे निधन झाले, हा संघासाठी मोठा धक्का होता. आयपीएल २०२० च्या सुरुवातील राजस्थान रॉयल्स संघाच्या ड्रेसिंग रूमबाहेर शेन वॉर्नचे पोस्टर लागले होते, ज्याने सगळेच भावूक झाले होते.

Story img Loader