आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १३ सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे सामन्यात कोणाचाी सरशी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत दोन सामने खेळलेले असून हे दोन्ही सामने जिंकलेले आहेत. या सलग विजयामुळे राजस्थान संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला दोन पैकी एका सामन्यात विजय मिळालेला असून दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. यामुळे बंगळुरु हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान
फाफ डू प्लेसिस नेतृत्व करत असलेल्या आरसीबीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. यावेळी संघाची भिस्त फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि विराट कोहली या आघाडीच्या फलंदाजांवर असेल. कोहलीने पंजाबविरोधातील पहिल्या सामन्यात ४१ धावा केल्या होत्या. तर कोलकाताविरोधातील दुसऱ्या सामन्यात कोहली फक्त १२ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोहलीला चमकदार कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.
तसेच फाफ डू प्लेलिसने पहिल्या सामन्यात ८८ धावा करुन संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत केली होती. हाच खेळ कर्णधार प्लेसिसला आजच्या सामन्यात कायम ठेवावा लागणार आहे. तर गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षल पटेल यांच्यावर संघाची भिस्त असणार आहे. शेवटच्या सामन्यात वानिंदू हसरंगाने तब्बल चार बळी घेत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही हसरंगा चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम
तर दुसरीकडे संजू सॅमसन नेतृत्व करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात बलाढ्य अशा मुंबईला नमवत विजय संपादन केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात जोस बटलर पुन्हा एकदा तळपणार का हे पाहावे लागेल. मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यात बटलरने शतकी खेळ केला होता. तसेच या सामन्यात संजू सॅमसन आणि हेटमायर यांच्याकडूनदेखील अपेक्षा आहेत.
तर गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल, नवदीप सैनी यांना आपली गोलंदाजी आजच्या सामन्यातही कायम ठेवावी लागणार आहे. या दोन आघाडीच्या गोलंदाजांना ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा यांनी साथ देणे गरजेचे आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनदेखील आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> IPL 2022 | तिकडे आईवर रुग्णालयात उपचार, इकडे विजयासाठी मुलाची झुंज, लखनऊच्या आवेश खानला सलाम !
राजस्थान रॉयल्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, नवदीप सैनी
रॉयल चॅलेंजर्स संघाचा बंगळुरु संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, डेव्हिड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप
आजचा सामना कोठे आणि किती वाजता खेळवला जाणार आहे ?
आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
आजचा सामना कोठे पाहता येईल ?
आजचा सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स ३ एचडी या चॅनेल्सवर हा सामना पाहता येईल. तसेच Disney Plus Hotstar app वरही हा सामना पाहता येईल. या सामन्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशिअल वेबसाईटवर मिळतील.