आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १३ वा सामना चांगलाच रंगतदार ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात काँटे की टक्कर झाली. शेवटच्या काही षटकांत सामना फिरल्यामुळे रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघाचा चार गडी राखून विजय झाला. दरम्यान, बंगळुरुने सामना जिंकललेला असला तरी या विजयासाठी त्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. विराट कोहली, फाफ डू प्लेसीस यांच्यासारखे दिग्गज फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे बंगळुरु संघ चांगलाच कचाट्यात सापडला होता. विराट कोहली बाद झाल्यामुळे तर बंगळुरुचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. सध्या विराटच्या अशाच एका चाहतीचा खास व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा >>> IPL 2022, RR vs RCB : युजवेंद्र चहल बल्ले बल्ले ! विराट कोहलीला केलं विचित्र पद्धतीने बाद, चेंडू फेकताच…
राजस्थानने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरुचे फाफ डू प्लेसीस आणि अनुज रावत फलंदाजीसाठी सलामीला उतरले होते. बंगळुरुच्या ६१ धावा असताना हे दोन्ही गडी बाद झाले. त्यानंतर बंगळुरुचा हुकुमी एक्का विराट कोहली मैदानात उतरला. संघाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडल्यामुळे तो नक्कीच चांगली कामगिरी करेल असे बंगळुरु आणि विराटच्या चाहत्यांना वाटत होते. मात्र विराट कोहलीला युजवेंद्र चहलने अवघ्या ५ धावांवर बाद केले. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो विचित्र पद्धतीने धावबाद झाला.
हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा >>> क्रिकेटपूट व्यंकटेश अय्यर करतोय ‘या’ सुंदर अभिनेत्रीला डेट ? फोटोवर कमेंट करताच चर्चेला उधाण
विराट बाद झाल्यानंतर मात्र बंगळुरुचे चाहते चांगलेच नाराज झाले. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची शक्ती विराटमध्ये आहे. मात्र अवघ्या पाच धावा करुन तो तंबुत परतल्यामुळे त्याच्या चाहत्यांना भावना अनावर झाल्या. त्यापैकीच एका चाहतीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट धाबवाद झाल्यानंतर या चाहतीने दु:ख व्यक्त केले. तिला भावना अनावर झाल्या होत्या. सध्या विराटच्या या महिला फॅनचा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, विराट पाच धावा करून बाद झालेला असला तरी दिनेश कार्तिकने एकाकी झुंज दिली. त्याने चौकार आणि षटकार लगावत बंगळुरुला चार गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला.