आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला गेला. हा सामना अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. कारण राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरु संघाला चांगलंच जेरीस आणलं. युजवेंद्र चहलने बंगळुरुच्या दोन फलंदाजांना एकापोठपाठ बाद केलं. विशेष म्हणजे चहलने विराट कोहलीला अगदी विचित्र पद्धतीने धावबाद केलंय.

हेही वाचा >>>IPL 2022 RR vs RCB : विराटने टिपला झेल, पण पंचांनी घेतला आक्षेप, बंगळुरु-राजस्थान सामन्यात मैदानावरच ड्रामा

चहलने कोहलीला कसं बाद केलं ?

१७० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची सुरुवात चांगली झाली. बंगळुरुचा पहिला गडी ५५ धावांवर बाद झाला. तर दुसरा गडी ६१ धावांवर अनुज रावतच्या रुपात बाद झाला. फाफ डू प्लेलीस आणि अनुज रावत हे सलामीचे गडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीदेखील अवघ्या पाच धावांवर बाद झाला. युजवेंद्र चगलने त्याला अगदी विचित्र पद्धतीन बाद केलं.

हेही वाचा >>> IPL 2022 : पुण्याच्या वाटेवर सचिनचे मराठीवरील प्रेम आले समोर, तेंडुलकरने कारमध्ये…

बंगळुरु संघ चांगल्या स्थितीत असताना युजवेंद्र चहलने चेंडू हातात घेतला. चहलने टाकलेल्या नव्या षटकातील चौथ्या चेंडूवर डेविड वेल्ली बचावात्मक पद्धतीने खेळला. त्याने फटका मारता चेंडूसमोर फक्त बॅट पकडली. यावेळी चोरटी धाव घेण्यासाठी विराट कोहली जोरात धावला. मात्र यष्टीरक्षक संजू सॅमसनने वायुवेगाने येत चेंडू थेट युजवेंद्र चहलकडे फेकला. चगलनेही वेळ न दवडता चेंडू स्टंप्सला लावला. परिणामी विराट कोहली धावबाद झाला.

हेही वाचा >>> लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान

विराट विचित्र पद्धतीने अवघ्या पाच धावांबर बाद झाल्यानंतर युजवेंद्रने पुढच्याच चेंडूवर डेविड वेल्लीलाही बाद केलं. कोहली बाद झाल्यानंतर मात्र बंगळुरुचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले.