चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने दमदार खेळी केली. त्याने अर्धशतकी खेळी करत चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात एक अनोखा विक्रम रचत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चेन्नई संघ आपल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार लगावत ५३ धावा केल्या. तसेच चेन्नईच्या मोईन अली आणि एन जगदीशन या जोडीनेही चांगली फलंदाजी केली. या दोंघांनी अनुक्रमे २१ आणि ३९ धावा केल्या. ज्यामुळे संघाला १३३ धावांपर्यंत मजल मारता आली. फिनिशर म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी मात्र कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या सात धावांवर बाद झाला.

हेही वाचा >> अॅन्ड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दु:ख, म्हणाला “आमच्या दोघांच्या…”

या सामन्यात ऋतुराज गायकवाडने अनोखा विक्रम रचला. त्याने आयपीएलमध्ये ३५ डावांत १२०५ धावा करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये ३५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऋतुराजने अव्वल स्थान गाठले आहे. सचिनने आयपीएलमध्ये ३५ धावांत ११७० धावा केलेल्या आहेत. तसेच ऋषभ पंतनेही ३५ धावांत १०८५ धावा केलेल्या आहेत. या दोघांनाही मागे टाकत त्याने ३५ डावांत सर्वाधिक म्हणजेच १२०५ धावा केल्या.

हेही वाचा >> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

दरम्यान, आजच्या सामन्यात चेन्नई संघाने गुजरातसमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य ठेवले. आव्हान संपुष्टात आलेला चेन्नई संघ आजचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 ruturaj gaikwad break record of sachin tendulkar in gt vs csk match prd