आयपीएल २०२२ च्या सुरुवातीला पंजाबच्या संघाने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का देत उत्तम कामिगिरी केली. याच कामगिरीमुळे आता पहिल्यांदाच पंजाबचा संघ किमान अंतिम फेरीपर्यंत तरी पोहोचेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र मालिकेच्या मध्यापर्यंत पंजाबच्या संघाचा ट्रॅक चूकला आणि नेहमीप्रमाणे पंजाबचा संघ क्वालिफायर सामन्यांआधीच बाहेर पडला. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळताना पंजाबच्या संघाला प्लेऑफच्या आधीच गाशा गुंडाळावला लागला. यंदा शिखर धवन पंजाबकडून खेळताना दिसला. मात्र त्याच्या खेळामध्ये सातत्याचा आभाव होता त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची यंदाच्या पर्वात निराशाच झाली.

नक्की वाचा >> हेटमायरच्या पत्नीबद्दल सुनिल गावस्करांचं वादग्रस्त वक्तव्य; RR vs CSK सामन्यात कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाले, “मोठा प्रश्न हा आहे की…”

शिखर धवनने आयपीएलदरम्यान आपल्या सहकारी खेळाडूंसोबत धमाल केल्याचं पहायला मिळालं. अनेकदा धवन मजेदार रील्स तयार करुन इन्स्टाग्रामवर शेअर करायचा. मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर धवनने एक नवीन रील शेअर केला असून त्यामध्ये त्याचे वडील त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शिखरने शेअर केलेल्या या व्हिडीओत आधी त्याचे वडील त्याच्या कानाखाली मारतात. त्यानंतर त्याला बुक्क्यांनी मारहाण करुन जमीनीवर पाडतात आणि मग लाथा मारताना दिसत आहेत. या सर्व प्रकारादरम्यान धवनच्या वडिलांच्या आजूबाजूचे लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये एकजण पोलीसांच्या वेशात असल्याचंही दिसतंय. धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता तुम्हाला खरोखरच धवन बाप-बेट्यांमध्ये काही वाद झाला का असं वाटत असेल तर थांबा. कारण हा व्हिडीओ धवनने केवळ मनोरंजन म्हणून बनवलाय.

नक्की वाचा >> IPL: सलग दुसऱ्या वर्षी अर्जूनला मुंबईच्या संघात स्थान न मिळाल्याबद्दल सचिन स्पष्टच बोलला; म्हणाला, “मला याबद्दल…”

शिखर धवनने हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये यासंदर्भात मजेदार वाक्य लिहिलंय. “आमचा संघ नॉक आउट फेरीसाठी पात्र ठरला नाही म्हणून माझ्या वडिलांनी मलाच नॉक आउट केलं,” अशी कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना धवनने दिलीय. धवनच्या या व्हिडीओवर ५ हजार ८०० हून अधिक कमेंट्स आल्या असून हा व्हिडीओ अनेकांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. या व्हिडीओ पोस्टला ४ लाख ९६ हजारहून अधिक लाइक्स आहेत.

नक्की पाहा >> LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय

तसं यंदाचं पर्व धवनसाठी चांगलं ठरलं असं म्हणता येईल. धवनने १४ सामन्यांमध्ये ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या. मागील सात पर्वांमध्ये धवनने कायमच ४५० हून अधिक धावा केल्यात.

Story img Loader