आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४० व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये लढत होत आहे. हे दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे विजय नेमका कोणाचा होणार हे सांगणे अवघड झाले आहे. या सामन्यात गुजरातचा अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीने धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने केन विल्यम्सनसारख्या तगड्या फलंदाजाला बाद करुन हैदराबादला रोखण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >> राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. कारण हैदराबादच्या अवघ्या २६ धावा झालेल्या असताना गुजरातला पहिली विकेट मिळाली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन मोहम्मद शमीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीपुढे त्याचा निभाव लागू शकला नाही. तो अवघ्या पाच धावा करुन तंबुत परतला.

हेही वाचा >> भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता

हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन फलंदाजी करण्यासाठी सलामीला आले होते. दोघेही मैदानावर स्थिरावण्यासाठी जबाबदारीने फलंदाजी करत होते. हैदराबादच्या २६ धावा झाल्यामुळे गुजरातला ही जोडी तोडणे गरजेचे झाले होते. हे काम मोहम्मद शमीने चोख बजावले. मोहम्मद शमीने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना केन विल्यम्सन गोंधळला. चेंडू नेमका कोठून येतोय हे न समजल्यामुळे त्याचा थेट त्रिफळा उडाला. परिणामी केनला अवघ्या पाच धावांवर तंबुत परतावे लागले.

हेही वाचा >> IPLच्या लिलावादरम्यान माझ्यासोबत फसवणूक आणि विश्वासघात झाला; हर्षल पटेलने सांगितली दुःखद आठवण

केन बाद झाल्यानंतर मात्र अभिषेक शर्माने दिमाखदार खेळी केली. त्याने ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. तसेच ऐडन मर्कराम यानेदेखील ४० चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्याने ५६ धावा केल्या.

Story img Loader