आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. प्रत्येक संघ तुल्यबळ असल्यामुळे विजय संपादन करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. दरम्यान, काल (सोमवार) झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघातील सामन्यात लखनऊने बाजी मारली. या विजयाचे शिलेदार लखनऊचे गोलंदाज ठरले. आवेश खानने तर हैदराबादच्या चार गड्यांना बाद करुन धडाकेबाज कामगिरी केली. हाच आवेश नंतर सामनावीर ठरल्यानंतर त्याने हे यश आपल्या आईला समर्पित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम

मिळालेल्या माहितीनुसार आवेश खान लखनऊ संघाकडून खेळत असताना त्याची आई रुग्णालयात होती. आईवर उपचार सुरु असताना आवेश खान मैदानावर हैदराबाद संघाला रोखू धरत होता. हैदराबादसमोर १७० धावांचे लक्ष्य असताना आवेशने हैदराबादच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बांधून ठेवलं होतं. त्याने या सामन्यात चार षटके टाकून २४ धावा देत ४ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळेच लखनऊ संघाचा दणदणीत विजय झाला.

हेही वाचा >>> जेसन होल्डर, आवेश खानने हैदराबादला रोखलं, शेवटच्या षटकात सामना फिरल्यामुळे लखनऊचा विजय

विशेष म्हणजे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन या सलामीच्या फलंदाजांना २० धावांच्या आत तंबुत पाठवण्याचे काम आवेश खानने केले. या कामगिरीनंतर आवेश खानला सामनावीर जाहीर करण्यात आले. आपले हे यश त्याने रुग्णालयात असलेल्या त्याच्या आईला समर्पित केले आहे. “माझे हे यश रुग्णालयात असलेल्या माझ्या आईला समर्पित करु इच्छितो. तिने मला वेळोवेळी खूप पाठिंबा दिलेला आहे. सामना संपल्यानंतर मी माझ्या आईला व्हिडीओ कॉल केला. सामन्यामध्ये काय काय झालं, याबद्दल मी तिला सांगितलं. देवाच्या कृपेने तिची प्रकृती सध्या चांगली आहे,” असे आवेश खानने टीममेट दीपक हुडाशी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> IPL 2022 : पहिल्या सामन्यात शून्यावर बाद, आता मात्र धावांचा पाऊस, वन मॅन आर्मी केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी

दरम्यान, लखनऊ आणि हैदराबाद या दोन संघात चांगलीच अटीतटीची लढत झाली. लखनऊने दिलेले १७० धावांचे लक्ष्य हैदराबादला गाठता आले नाही. हैदराबादचा पूर्ण संघ १५७ धावांवरच बाद झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 srh vs lsg lucknow super giants bowler avesh khan dedicated his success to his hospitalised mother prd