आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर तर सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात शेवटी म्हणजेच १० व्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या हंगामात हैदराबाद सनरायझर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हो दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करणार आहेत. त्यामुळे आजचा सामना चांगलाच चुरशीचा होणार आहे. लखनऊने आतापर्यंत एकूण दोन सामने खेळलेले असून लखनऊला एकामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने आतापर्यं फक्त एक सामना खेळलेला असून या सामन्यात हैदराबादचा पराभव झालेला आहे.

हेही वाचा >>> जाडेजा शून्यावर झाला बाद, चेन्नईच्या कर्णधाराने स्टंपवर काढला राग, भर मैदानात नेमकं काय केलं ?

सनरायझर्सने या आधीचा सामना राजस्थान रॉयल्सविरोधात खेळलेला असून ६१ धावांनी हैदराबादला पराभव पत्करावा लागलेला आहे. या सामन्यात डन मर्कराम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगला खेळ करत अनुक्रमे ५७ आणि ४० धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यातही हे फलंदाज चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे पहिल्या फळीतील फलंदाज केन विल्यम्सन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पुरन यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. मागील सामन्यात हे सर्व आघाडीचे खेळाडू दहा धावादेखील करु शकलेले नाहीत.

उमरान मलिक, टी नटरजान या गोलंदाजांवर संघाची भिस्त असेल. तर भुवनेश्वर, रोमारिओ शेफर्ड यांना नटराजन आणि मलिक यांना साथ द्यावी लागेल.

हेही वाचा >>> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम

तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सने एकूण दोन सामने खेळलेले असून यापैकी चेन्नईविरोधातील सामन्यात विजय मिळवलेला आहेत. तर गुजरात टायटन्सविरोधातील पहिल्याच सामन्यात या संघाला पराभव पत्करावा लागला होता. आजच्या सामन्यात केएल राहुल, क्विंटन डिकॉक, लुईस, मनिश पांडे यांना चांगली फलंदाजी करुन दाखवावी लागेल. तर दीपक हुडा आणि आयुष भदोनी यांना आपल्या खेळात सातत्य ठेवावे लागणार आहे.

तसेच लखनऊच्या गोलांदाजांनी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. आवेश खान, रवी बिश्नोई या गोलंदाजांवर संघाची भिस्त असेल. तर अँड्र्यू तै कृणाल पांड्या यांनादेखील बिश्नोई आणि खान यांना साथ द्यावी लागेल.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान

सनरायझर्स हैदराबाद संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक</p>

हेही वाचा >>> तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

सामना कोठे खेळवला जाईल, किती वाजता सुरु होणार ?

आजचा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमीच्या स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

आजचा सामना कोठे पाहता येईल ?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स ३ एचडी या चॅनेल्सवर हा सामना पाहता येईल. तसेच Disney Plus Hotstar app वरही हा सामना पाहता येईल. या सामन्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशिअल वेबसाईटवर मिळतील.