राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या (IPL) १५ व्या हंगामातील पाचव्या सामन्यात पहिल्याच सामन्यात तुफान खेळी केली. हैदराबाद विरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या राजस्थानने ६ विकेट गमावत २१० धावांचा डोंगर उभा केला. यात जवळपास प्रत्येक खेळाडून योगदान दिलं. त्यात कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) खेळीचं चाहत्यांनी चांगलंच कौतुक केलंय.

संजू सॅमसनने तडाखेबाज फलंदाजी करत २७ चेंडूत ५५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. याशिवाय देवदत्त पडीक्कलने देखील ४१ धावांची शानदार कामगिरी केली. त्याने २९ चेंडूंचा सामना करत ४१ धावा काढल्या. जोस बटलरने त्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत ३५ धावा केल्या. यासह राजस्थानने ६१ धावांनी हैदराबादला पराभूत केलं.

Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना

हेही वाचा : IPL 2022, SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर ६१ धावांनी दणदणीत विजय

या विजयानंतर सोशल मीडियावर संजू सॅमसनच्या खेळाचं चांगलंच कौतुक होत आहेत. कोणी सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाचं कौतुक करत आहे, तर कोणी सॅमसनने हंगामाच्या पहिल्या सामन्यात केलेल्या कामगिरीची माहिती देत त्याची पाठ थोपटत आहे. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे,

चाहते म्हणाले संजू सॅमसनने आयपीएलच्या हंगामात पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिली वेळ नाही.

एकूणच संजू सॅमसनवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या कर्णधारपदाचीही प्रशंसा होत आहे.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल २०२२ च्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्सला २११ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, सनरायझर्सला २० षटकात ७ बाद केवळ १४९ धावाच करता आल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

हेही वाचा : IPL 2022, SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर ६१ धावांनी दणदणीत विजय

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन :

केन विल्यमसन – कर्णधार, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, रोमारिया शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक</p>

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :

संजू सॅमसन – कर्णधार, जोस बटलर , यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्वीन, नाथन कोल्टर निल, प्रसिध क्रिष्णा, ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल

Story img Loader