गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चांगलीच अटीतटीची लढत झाली. गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात २२ धावा केल्यामुळे हा सामना शेवटपर्यंत रोमहर्षक ठऱला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने कमाल करत शेवटच्या षटकात चार षटकार लगावून गुजरातला विजय मिळवून दिला. मात्र दुसरीकडे हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमारन मलिक हादेखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला. त्याने एकट्याने गुजरातच्या पाच गड्यांना तंबुत पाठवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> तेवतिया-राशिद खाननं करून दाखवलं; शेवटच्या चेंडूवर गुजरातचा हैदराबादवर चित्तथरारक विजय

हैदरबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांने एकट्याने पाच विकेट्स घेतल्या. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने गुजरातला रोखण्याचा प्रयत्न केला. गुजरातची वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानावर सेट झालेली असताना उमारन मलिकलने या दोघांनाही त्रिफळाचित करत तंबुत पाठवलं. सलामीचे हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यामुळे गुजरातवर दबाव निर्माण झाला. तसेच सध्या फॉर्ममध्ये असणारा गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यालादेखील उमरान मलिक यानेच बाद केले. हार्दिक दहा धावांवर असताना मलिकच्या चेंडूवर झेलबाद झाला. हैदराबादचे बाकीचे गोलंदाज फोल टरत असताना उमरान मलिक मात्र चांगलाच तळपत होता. त्याने पुढे डेविड मलिक आणि अभिनव मनोहर अशा दिग्गजांना त्रिफळाचित केलं. मिलरने १७ धावा केल्या. तर मनोहर खातंदेखील खोलू शकला नाही.

हेही वाचा >> ४, २, १, ६, ६, ६! हैदरबादचा शशांक तळपला, फक्त सहा चेंडूंमध्ये केल्या २५ धावा

उमरानच्या याच कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी हात टेकले होते. गुजरात टायटन्सचे एकूण पाच गडी बाद झाले. हे पाचही फलंदाज एकट्या उमरान मलिकनेच बाद केले. मात्र त्याच्या या प्रयत्नांना यश मिळालने नाही. शेवटी राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गुजरातने पाच गडी राखत १९६ धावांचे लक्ष्य गाठले आणि आपल्या नावावर विजय नोंदवला.