आयपीएल २०२२ चा ६५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हैदराबादने हा सामना ३ धावांनी जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य होते, परंतु संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १९० धावा करता आल्या आणि सामना ३ धावांनी गमवावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा ४८ धावा करून बाद झाला. इशान किशनने ४३ धावा केल्या. टिळक वर्मा ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डॅनियल सॅम १५ धावा करून पुढे गेला. ट्रिस्टन स्टब्स २ धावा करून धावबाद झाला. टीम डेव्हिड ४६ धावा करून धावबाद झाला. संजय यादवला खातेही उघडता आले नाही.

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा आयपीएल २०२२ चा आतापर्यंतचा हंगाम संस्मरणीय राहिला आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध उमरानने तीन षटकांत २३ धावा देत तीन बळी घेतले. उमरानने इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि तिलक वर्मा यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना तीन धावांनी जिंकला. सामन्यादरम्यान विकेट घेतल्यानंतर उमरानच्या सेलिब्रेशन करण्याच्या पद्धतीची खूप चर्चा होत आहे. मुंबई इंडियन्सनंतर त्याने हे विशेष सेलिब्रेशन एका खास अंपायरकडून शिकल्याचे म्हटले आहे.

सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारशी झालेल्या संवादादरम्यान उमरान म्हणाला, “जेव्हा आम्ही नेटमध्ये गोलंदाजी करतो तेव्हा संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन हे अंपायर असतात. जेव्हा मी नेटमध्ये विकेट घेतो तेव्हा स्टेन असे सेलिब्रेट करतात आणि त्यांना पाहून मी हे करायला सुरुवात केली आणि आता ती माझी सवय झाली आहे.” उमरानने या आयपीएल हंगामात १३ सामन्यांमध्ये एकूण ४७ षटके टाकली असून ८.९३ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत आणि २१ बळी घेतले आहेत.

“हा माझा पहिला पूर्ण हंगाम आहे, हा माझा १३ वा खेळ होता. मी सर्व सामने खेळले आहेत, त्यामुळे ते खूप चांगले वाटते. मी विकेट्स घेतल्या आहेत आणि धावाही काढल्या आहेत. त्या सामन्यांमध्ये मी केलेल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला आहे,” असे उमरान म्हणाला.

जेव्हा भुवनेश्वर कुमारने त्याला विचारले की टेनिस बॉलने गोलंदाजी केल्याने त्याला वेगवान गोलंदाजी करण्यास मदत होते का, तेव्हा उमरान म्हणाला, “मी टेनिस बॉलसह यॉर्कर टाकायचो आणि खूप वेगवान यॉर्कर बॉल असतानाही माझ्या बॉलला कोणी सामोरे जायचे नाही.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 umran malik has learned from dale steyn umpire punch celebration abn