केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सला रोमहर्षक लढतीत दोन धावांनी पराभूत करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. सामना संपल्यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर खूप आनंदी आणि उत्साही दिसत होता. गंभीरच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. केकेआरचा संघ २० षटकांत केवळ २०८ धावा करू शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. केएल राहुलने मार्कस स्टॉइनिसच्या हातात चेंडू टाकला आणि रिंकू सिंहने पहिल्या चेंडूवर चौकार मारून पुढच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचून सामना केकेआरकडे वळवला. आता कोलकाताला शेवटच्या तीन चेंडूत ५ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने दोन धावा घेतल्या, पण पुढच्या चेंडूवर तो ४० धावांची तुफानी खेळी खेळून बाद झाला. एव्हॉन लुईसने रिंकूचा पॅव्हेलियनच्या वाटेवर अप्रतिम झेल घेतला. आता केकेआरला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि उमेश यादव क्रीजवर होता. स्टॉइनिसने उमेशला शानदार यॉर्करवर बोल्ड केले आणि हरलेली सामना जिंकला.

या रोमांचक सामन्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला गौतम गंभीर खूप आनंदी दिसत होता. यादरम्यान, तो मोठ्या उत्साहाने सहकारी खेळाडूंना मिठी मारताना दिसला. गौतमला आपण फक्त त्याच्या गंभीर शैलीसाठी ओळखतो, अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्याचे हे रूप क्वचितच पाहिले असेल.

लखनऊ सुपर जायंट्स हा या विजयासह प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे, तर श्रेयस अय्यरचा आयपीएल २०२२ मधील कोलकाता नाइट रायडर्सचा प्रवास या पराभवाने संपला आहे.

दरम्यान, आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉक १४० आणि कर्णधार केएल राहुल ६८ धावांवर नाबाद माघारी परतले. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या. आयपीएलमधील डि कॉकची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दोघांनी २१० धावांची सलामी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.