आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने रोमहर्षक होत आहेत. या हंगामातील पंधरावा समना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएश स्टेडियमवर होणार असून हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, हा सामना सुरु व्हायला अवघा तास शिल्लल असताना बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना त्रिफळा उडाल्यामुळे कोहलीला राग अनावर झाला आहे. त्याने हा राग बॅट आणि स्टंप्सवर काढलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> Video | ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

आरसीबीचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसतोय. नेटमध्ये सराव करत असताना त्याचा त्रिफळा उडाल्यामुळे तो बाद झाला आहे. याच कारणामुळे विराटला संताप अनावर झाला. त्रिफळा उडताच त्याने रागात बॅड वर केली आहे. तसेच स्टंप्सवर मारण्याचा त्याने प्रयत्न केलाय. तसेच दुसरी बॅट घेऊन स्टंप्सवर मारली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> IPL 2022 PBKS vs GT match: पंजाब किंग्जच्या दमदार फलंदाजीनंतर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया

दुसरीकडे या हंगामात विराट कोहली आतापर्यंत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. विराट आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये फक्त ५३ केल्या आहेत. यातील एका सामन्यात त्याने २९ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या होत्या. तर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तो फक्त १२ धावा करु शकला होता. राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात तो पाच धावांवर असताना धावबाद झाला होता.

हेही वाचा >> मद्यप्राशन केलेल्या संघ-सहकाऱ्याकडून गैरवर्तन!; २०१३च्या ‘आयपीएल’मधील अनुभवाचा चहलकडून गौप्यस्फोट

दरम्यान, आज संध्याकाळी ७.३० वाजता मुंबई आणि हैदराबाद या दोन संघामध्ये लढत होणार आहे. मुंबईने आतापर्यंत तीन सामने गामावले आहेत. तर बंगळुरुला तीनपैकी एका सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत बरेच खाली आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकण्याचा या दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 virat kohli got angry in practice net before mi vs rcb match prd