रविवारी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने एक विकेट घेतली. या कामगिरीनंतर नटराजनने आता १२ विकेट घेतल्या असून या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानवार राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. रविवाराच्या सामन्यानंतर नटराजन आणि चहल दोघांनाही समान विकेट मिळवल्या आहेत. मात्र सर्वाधिक विकेटच्या यादीत चहल पहिल्या स्थानी आहे आणि पर्पल कॅपही त्याच्याकडे आहे.
राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलकडेही १२ विकेट्स आहेत आणि सध्या आयपीएल २०२२ ची पर्पल कॅप चहलकडे आहे. युझवेंद्र आणि नटराजन दोघांनीही समान १२ विकेट्स घेतल्या आहेत. तरीही चहलकडे पर्पल कॅप कायम आहे. कारण चहल नटराजनपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. याशिवाय चहलने नटराजनपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. त्यामुळे समान विकेट घेऊनही पर्पल कॅप सध्या युझवेंद्र चहलकडेच आहे.
गोलंदाज | मॅच | विकेट | सर्वोत्तम खेळ |
युझवेंद्र चहल | ५ | १२ | ४१/४ |
टी नटराजन | ६ | १२ | ३७/३ |
कुलदीप यादव | ५ | ११ | ३५/४ |
आवेश खान | ६ | ११ | २४/४ |
वानिंदू हसरंगा | ६ | ११ | २०/४ |
यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुलदीपच्या नावावर पाच सामन्यांत ११ बळी आहेत. चहल आणि नटराजनच्या १२ विकेट्सपासून तो आता फक्त एक विकेट दूर आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खान आणि बंगळुरूच्या वानिंदू हसरंगा यांच्याही प्रत्येकी ११ विकेट आहेत. हे गोलंदाजही टॉप-५ मध्ये आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आणि चेन्नई सुपर किंग्जचा ड्रावेन ब्राव्हो सहा सामन्यांत प्रत्येकी १० बळी घेत अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी पंजाब किंग्जचा राहुल चहर आणि सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक देखील सहा सामन्यात प्रत्येकी नऊ विकेट्ससह अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी सहा सामन्यांत आठ विकेट्स घेऊन टॉप-१० मध्ये कायम आहे.