Virat Kohli early days in RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हाही खेळपट्टीवर पाऊल ठेवेल तेव्हा मोठी खेळी खेळेल अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा असते आणि अजूनही आहे. आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, अनुभवी फलंदाज म्हणून कोहलीची लौकिक, प्रतिष्ठा कायम आहे. परिस्थिती कशीही असो, कोहली खेळपट्टीवर असेल तर विजयाची आशा आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या मोसमात विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ४९ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली, मात्र त्यानंतर कोलकाताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला खास काही करून दाखवता आले नाही. कोहलीने केवळ २१ धावा केल्या आणि तो तंबूत परतला. कोहलीचा शेवटचा आयपीएल मोसम फारसा चांगला नव्हता, त्याच्या बॅटमधून फारश्या धावा झाल्या नाहीत. मात्र, या मोसमात त्याच्या बॅटमधून नक्कीच चांगल्या धावा निघतील यात अजिबात शंका नाही.

हेही वाचा: IPL 2023: मुंबईत चेन्नई सुपर किंग्जचे जंगी स्वागत! महाराष्ट्राच्या आदरातिथ्याने भारावला धोनी, फ्रँचायझीने शेअर केला खास VIDEO

मोहम्मद कैफने विराट कोहलीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला

कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्सशी जोडला गेला आहे परंतु आतापर्यंत तो विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला, मात्र कोहलीने वेळोवेळी आपली दमदार कामगिरी दाखवली आहे. कोहली सध्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. दरम्यानच्या काळात RCB संघातील माजी सहकारी मोहम्मद कैफने IPL च्या सुरुवातीच्या काळात फलंदाजांच्या धावांच्या भूकेबद्दल एक मनोरंजक कथा शेअर केली. कैफने त्या काळातील आठवण सांगितली, “जेव्हा कोहली एकदा खराब शॉट खेळून कमी धावसंख्येवर बाद झाला होता तेव्हा त्याने ड्रेसिंग रूममध्ये खूप राग काढला होता.”

‘कोहलीने येताच बॅट फेकून दिली होती’- कैफ

कैफ पुढे म्हणाला, “विराट कोहली आज (गुरुवारी केकेआर विरुद्ध) जसा आऊट झाला तसाच तेव्हा आऊट झाला होता. असे आज पुन्हा एकदा घडले आहे. मी त्याच्या शेजारी बसलो होतो आणि मला वाटले की तो रागाने त्याची बॅट फेकून देईल, मग तो आला तेव्हा त्याने लगेच बॅट फेकून दिली. त्यानंतर पॅड काढला, हे सर्व घडत असताना मी त्याच्या शेजारी बसलो होतो. त्यावेळी कोहली पुढे म्हणाला, ‘मी करेन.’मी म्हणालो पुढच्या वेळी मोठे व्हा, ‘गोइंग टू बिग स्कोअर”, कैफने स्टार स्पोर्ट्सवरील समालोचन करताना हा किस्सा शेअर केला.

हेही वाचा: Amit Mishra Catch: युवा खेळाडूलाही लाजवेल अशी ४० वर्षीय मिश्राने चित्याची चपळाई दाखवत पकडला अफलातून झेल, Video व्हायरल

कोहलीने पुढच्या सामन्यात ७२ धावांची नाबाद खेळी खेळली

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, “कोहलीने पुढच्या सामन्यात ७२ धावांची नाबाद खेळी खेळली. तो नक्कीच असा आउट होतो पण पुढच्या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी तो पूर्णपणे विसरतो आणि त्यावेळी मला जाणवले की तो एक स्टार खेळाडू आहे. भारताला हा मिळाला हे टीम इंडियाचे भाग्य आहे.”

Story img Loader