IPL 2023 LSG vs RCB Match Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांच्या वेदना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. जेव्हा जेव्हा त्यांना वाटते की त्यांचा संघ विजयाच्या जवळ आहे, तेव्हा असे काहीतरी घडते की त्यांच्या उत्सवाचे रूपांतर अश्रूंमध्ये होते. सोमवारही काहीसा असाच होता. शेवटच्या चेंडूवर लखनऊच्या हातून २१२ धावा करूनही आरसीबीचा पराभव झाला. या पराभवामुळे एका चाहत्याचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा पराभव झाला –
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. यानंतर लखनऊनेही जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यानंतर अखेरच्या षटकात सर्वकाही येऊन थांबले. या षटकात खूप नाट्यमय घडोमोडी घडल्या. लखनऊला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी हे काम पूर्ण केले. आवेश खान चेंडू खेळू शकला नाही आणि धाव घेण्यासाठी धावला, दिनेश कार्तिकच्या हातून चेंडू निसटला. त्यानंतर रवी बिश्नोई धावत जाऊन स्ट्राईकवर पोहोचला. या धावेने आरसीबीच्या चाहत्यांची मनं तुटली.
चाहत्याचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल –
लखनऊच्या विजयानंतर मैदानावर जल्लोष सुरू झाला. तेव्हा या पराभवाने भंग पावलेल्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आरसीबीच्या चाहत्यावर फिरवला. तेव्हा आरसीबीची फॅन असलेल्या तरुणीला आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. तिने आधी डोके धरले आणि मग रडू लागली. काही वेळातच या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ शेअर करताना आरसीबीच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. आरसीबीने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. असे असूनही या संघाची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.
आरसीबीचे चाहते दरवर्षी आपला संघ जेतेपद पटकावतील अशी आशा बाळगतात –
अलीकडेच एका मुलाखतीत विराट कोहली म्हणाला होता की, जरी त्याचा संघ विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला असला, तरी त्याचे चाहते जगातील पहिल्या क्रमांकाचे चाहते आहेत. सोशल मीडियावर आयपीएल असते, तर केवळ चार सामने खेळून आपला संघ चॅम्पियन झाला असता, असा दावा त्याने केला होता. आरसीबीचे चाहते दरवर्षी आपला संघ जेतेपद पटकावतील अशी आशा बाळगत असतात, पण आजपर्यंत त्यांचे हे स्वप्न पूर्ण झालेले नाही.