इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी पहिले षटक टाकले आणि त्यात फक्त त्याने चार धावा दिल्या. अर्जुनने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋद्धिमान साहाला तंबूत धाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढेच नाही तर दुसऱ्या षटकात त्याने केवळ ५ धावा दिल्या. अर्जुनने अशा प्रकारे दोन षटकात ९ धावा देत एक विकेट घेतली, मात्र त्यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टॉम मूडी यांनी रोहितच्या निर्णयाचे समर्थन केले असले तरी. मुडी म्हणाले की, “अर्जुन हा एक्स्ट्रा गोलंदाज आहे आणि चार षटके एक्स्ट्रा गोलंदाजाकडून कुठल्याही संघाचा कर्णधार कधीच टाकून घेत नाही, काही अपवादात्मक वेळेसच जर मुख्य गोलंदाजाला जास्त धावा पडल्या किंवा संघात जास्तीचा फलंदाज घेतला तर अशावेळी त्या गोलंदाजाकडून पूर्ण षटके टाकली जातात. त्यामुळे अर्जुन हा पार्ट टाइम गोलंदाज आहे.” असे अजब विधान त्यांनी केले आहे.

हेही वाचा: IPL 2023: रागाने लालबुंद झालेले डोळे त्यानंतर साथी खेळाडूवरचा राग; धोनीचा रागावलेला लूक तुम्ही कधी पाहिला आहे का? पाहा Video

टॉम मूडी ईएसपीएनक्रिकइन्फोवर बोलताना म्हणाला, “तेंडुलकरने त्याचे काम केले. तो अतिरिक्त गोलंदाज आहे आणि अतिरिक्त गोलंदाजाला चार षटके दिली जात नाहीत. त्याने पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दोन षटकात एक विकेट फक्त ९ धावा दिल्या. ग्रीनऐवजी अर्जुनला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी टाकायला द्यायला हवी होती. ग्रीन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि त्याने खराब गोलंदाजी केली. पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने एका षटकात ३१ धावा दिल्या होत्या. डेथ ओव्हरमध्ये अर्जुनचे ते षटक मुंबई इंडियन्सला शेवटी महागात पडले. त्यामुळेच रोहितने त्याला गोलंदाजी दिली नसावी.”

अर्जुन तेंडुलकरचा पहिला षटकार

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन गेल्या आयपीएल हंगाममध्ये बेंचवर बसला असतानाही चर्चेत होता. आता तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-११चा भाग बनताना दिसतोय. प्रत्येक सामन्यात तो काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. कधी आयपीएल पदार्पणामुळे, कधी पहिल्या विकेटमुळे, कधी एका षटकांत ३१ धावा दिल्यामुळे… पण आता तो चर्चेत आलाय ते आयपीएलमधील पहिल्या गोलंदाजीमुळे… त्याने कालच्या सामन्यात शानदार षटकार मारला.

हेही वाचा: BCCI revenue share: आयसीसीच्या दरबारी बीसीसीआयच राजा! करामध्‍ये सूट नाही तरी महसुलातील ३९% वाटा उचलणार!

अर्जुन तेंडुलकरला प्रथमच आयपीएलमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १८व्या षटकात पियुष चावला बाद झाला. यानंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर बॅट घेऊन मैदानात उतरला. त्याने ९ चेंडूत १३ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने षटकारही मारला. २०व्या षटकात तो मोहित शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईने हा सामना ५५ धावांनी गमावला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 arjun tendulkar is an extra bowler ex hyderabad coach tom moodys strange statement sparks confusion avw