इंडियन प्रीमियर लीगच्या शुक्रवारी (२३ डिसेंबर) रोजी झालेल्या मिनी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्सला रु. ३.२० कोटीत विकत घेतले. या २४ वर्षीय क्रिकेटपटूची मूळ किंमत रु. १.५ कोटी होती. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये या क्रिकेटपटूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चढाओढ सुरु होती जी अखेर बंगळुरूने जिंकली. मात्र त्यानंतर स्वागतासाठी वापरलेल्या फोटोवरून बंगळुरू प्रचंड ट्रोल होत आहे.
बरीच मोठी रक्कम खर्च करून आरसीबीने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आणि याची घोषणा करण्यासाठी त्यांनी ट्विटरवर त्याचा आरसीबी चा क्रेस्ट घातलेला फोटो पोस्ट केला. प्रत्युत्तरादाखल, या तरुण क्रिकेटपटूने त्याला संधी दिल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार मानले मात्र त्यांनी त्याचे स्वागत करताना वापरलेल्या फोटोसाठी आभार मानता येणार नाही असे म्हणत ट्रोल केले. विल जॅक्स या फोटोत अंतराळातून उतरलेल्या एलियन सारखा वाटतो असे म्हणत अनेक चाहत्यांनी देखील आरसीबी ची खिल्ली उडवली.
उजव्या हाताचा फलंदाज शेवटचा कसोटी सामना इंग्लंडकडून खेळला होता. नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सहभागी झालेल्या संघाचा भाग होता. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला आणि मालिकेच्या सलामीच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात सहा विकेट्स घेतल्या. आत्तापर्यंत, जॅक्सने इंग्लंडसाठी एकूण २ कसोटी आणि अनेक टी२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे ८९ आणि ४० धावा केल्या आहेत. खेळाच्या रेड-बॉल फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सहा विकेट्स आहेत. त्याच्या टी२० च्या आकडेवारीबद्दल, त्याने एकूण १०२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २५३२ धावा केल्या आहेत आणि २३ बळी घेतले आहेत.
आरसीबी सेटअपमध्ये, तो शेरफेन रदरफोर्ड जो या वर्षीच्या मिनी-लिलावात विकला गेला नाही आदर्श बदली खेळाडू ठरू शकतो. २४ वर्षीय रदरफोर्ड, ज्याने भूतकाळात मुंबई इंडियन्ससह आयपीएल विजेतेपद जिंकले आहे, तो पैशाने समृद्ध असलेल्या लीगच्या २०२२ च्या हंगामात आरसीबी संघाचा भाग होता परंतु त्याच्या कामगिरीने प्रभावित करू शकला नाही. त्याने संघासाठी तीन सामने खेळले आणि एकूण ३३ धावा केल्या, त्यापैकी २८ धावा फक्त एका सामन्यात आल्या आहेत.