CSK vs KKR IPL 2023: रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा भर मैदानात लाइव्ह सामन्यादरम्यान अंपायरशी वाद घालताना दिसला. या प्रकरणाची आता बीसीसीआयने दखल घेतली असून राणावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा अंपायरशी भिडला, त्याच्यात आणि अंपायरमध्ये शाब्दिक वाद झाला. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या १९व्या षटकात असे काही घडले, ज्यामुळे नितीश राणा आणि अंपायर यांच्यात खडाजंगी झाली.

नितीश राणावर बीसीसीआय कारवाई करण्याच्या तयारीत!

त्याचे असे झाले की, कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील १९व्या षटकात गोलंदाजी करायला आला. शार्दुल ठाकूरच्या या षटकातील पाचवा चेंडू अंपायरनी वाईड घोषित केला. यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याच्या संमतीशिवाय अंपायरनी या वाइड बॉलचा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला तेव्हा परिस्थिती आणखीच बिघडली. वाइड बॉलसाठी डीआरएसची मागणीही केली नसताना अंपायरने त्यांच्या संमतीशिवाय निर्णय तिसऱ्या अंपायरकडे कसा दिला, हे नितीश राणाला कळले नाही यावर त्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

दुसरीकडे, २० षटके वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा कोलकाता संघाने ओलांडली गेली आणि स्लो ओव्हर रेटमुळे त्याला शेवटच्या षटकात ५ ऐवजी ४ क्षेत्ररक्षकांना ३० यार्ड वर्तुळाबाहेर ठेवणे भाग पडले. त्यामुळे त्याचा पारा अधिकच वाढला. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजासोबत फलंदाजी करत होता आणि केकेआरचा गोलंदाज वैभव अरोरा शेवटचे षटक टाकणार होता. मात्र त्याच दरम्यान राणा आणि अंपायर यांच्यातील संवाद टीव्हीवर सर्व लोकांनी पाहिला त्यात राणा भडकलेला होता. समालोचक त्याच्याच शब्दात त्याचा अनुवाद करत होते की, मीच कर्णधार आहे, असे सांगण्याचा तो प्रयत्न करत असावा आणि माझा इशारा न देता तुम्ही स्वतःहून निर्णय कसा घेतला.

या जोरदार शाब्दिक वादात वेळ निघून गेला. अरोराने शेवटचे षटक टाकले ज्यात फक्त ९ धावाच चेन्नईला काढता आल्या. या षटकात वेगवान गोलंदाज अरोराने नो-बॉलही टाकला. त्यात त्याने एम.एस. धोनीला फ्री-हिट चेंडूवर क्लीन बोल्ड केले. दुसरीकडे, रिंकू सिंग आणि नितीश राणा यांच्या अर्धशतकांमुळे केकेआरने रविवारी एम.ए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेचा ६ गडी राखून पराभव केला.

हेही वाचा: IPL2023: चेपॉकमध्ये एम.एस. धोनीचा शेवटचा सामना? माहीने खास अंदाजात चाहत्यांना केले अभिवादन, सुंदर क्षणाचा Video व्हायरल

याआधीही त्याने वाद घातला आहे

याआधीही आयपीएल २०२३च्या मोसमात नितीश राणाला दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा हृतिक शोकीनसोबत वाद झाला होता. बीसीसीआयने नितीश राणा आणि शोकीन या दोघांनाही दंड ठोठावला होता. नितीश राणा म्हणाला की, त्याने रिव्ह्यू मागितला नाही, मग तुम्ही डीआरएससाठी थर्ड अंपायरला सिग्नल का देत आहात? या मुद्द्यावरून अंपायर आणि नितीश राणा यांच्यात वादावादी झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर बीसीसीआय नितीश राणा यांच्यावर कठोर कारवाई करू शकते.

Story img Loader