महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स वेगवान गोलंदाजी अष्टपैलू अर्जुनने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यापासून आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली अर्जुनच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला आहे. अर्जुन वेगाचा व्यापारी बनू शकतो आणि तो १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो, असा त्याचा विश्वास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, “जेव्हा ब्रेट लीला विचारण्यात आले की मुंबईमध्ये खेळताना त्याने कोणत्या बॉलिंग स्पेलमध्ये गोलंदाजी करणे योग्य असेल? कारण त्याची सुरुवातीची फेज आहे.?” त्यावर तो म्हणाला, “मला वाटते की तो सर्व स्पेलमध्ये गोलंदाजी करू शकतो.” तो पुढे म्हणाला, “मी अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीने खूप प्रभावित झालो आहे. मला वाटते की तो मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करताना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याची नवीन चेंडूवर गोलंदाजी उत्कृष्ट होत आहे. तो चेंडू अप्रतिम स्विंग करत आहे. अर्जुन मधल्या षटकांसाठी अनुकूल असून जसजसा तो अनुभवी होईल तसतसे अधिक चांगली गोलंदाजी करेल. त्याची डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे.”
आयपीएलमधील तीनही सामन्यांदरम्यान अर्जुन सोशल मीडियावर चर्चेत राहिला. पण सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याचा वेग १०७.२ किमी प्रतितास दिसला आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा स्थितीत त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यावर ब्रेट लीने अर्जुनला सचिनच्या कारकिर्दीतून शिकण्याचा सल्ला दिला आहे, निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ब्रेट ली म्हणाला, “लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करतात. जर तुम्ही संदीप शर्माला पाहिले तर तो १२० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. अर्जुन किमान त्याच्यापेक्षा अधिक वेगवान गोलंदाजी करतो. तो फक्त २३ वर्षांचा आहे आणि त्याच्या पुढे संपूर्ण कारकीर्द पडली आहे.”
ब्रेट ली म्हणाला, “माझा अर्जुनला सल्ला आहे की टीकाकारांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नको. वडिलांच्या कारकिर्दीतून शिक. सचिनला देखील अशा चढउतारातून जावे लागते. अर्जुलकडे अप्रतिम कौशल्य असून तो १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. स्टेडियममधील मोठे दिवे आणि अधिक प्रेक्षकांसमोर खेळण्याची ज्यावेळी त्याला सवय होईल त्यावेळी त्याचा आणखी वेग वाढेल.”
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “मला त्याच्या वेगात कोणतीही अडचण दिसत नाही. तो किती वेगवान गोलंदाजी करू शकतो हे मला माहीत आहे. त्याच्याकडे प्रतिभा आणि इतर सर्व काही गोष्टी आहेत. त्यामुळे अर्जुन जे करत आहे ते करत राहा असा माझा सल्ला असेल. जे लोक तुला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे ऐकू नको. लक्षात ठेवा की सोशल मीडियावर टीका करणार्या बहुतेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात एकही चेंडू टाकलेला नाही. ते फक्त कीबोर्ड योद्धे आहेत.”