IPL 2023 CSK vs GT Highlights Cricket Score in Marathi: शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने शानदार विजय मिळवला. गुजरातने चेन्नईला ५ विकेट्सने पराभूत करत थाटात सुरुवात केली. गुजरातने आयपीएल इतिहासात चेन्नईला तिसऱ्यांदा सामना करताना पराभूत केले. या विजयात गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले.
पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल २०२३ मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, अर्धशतक करत तो आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिले अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याचे शतक देखील होईल असे वाटत होते मात्र तो ५० चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला १४ धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड याने एका बाजूने संघाची खिंड लढवत अर्धशतक पूर्ण केले.
ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मोईन अलीने २३ धावांची खेळी केली, तर धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत नाबाद १४ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. जोशुआ लिटलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.
गुजरात संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त फलंदाज शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्मात आहे. फिरकीपटू राशिद खान अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो आपली लय आणि सातत्य राखतो. अशा परिस्थितीत गुजरात संघाला पराभूत करणे हे सोप नव्हतं. राष्ट्रीय संघाच्या सामन्यांमुळे डेव्हिड मिलर सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता.
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights Match Update: चेन्नई सुपर किंग्स वि गुजरात टायटन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर
शुबमन गिलचे शानदार अर्धशतकाच्या जोरावर अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईवर पाच गडी राखून आयपीएल २०२३ मधील पहिला विजय नोंदवला.
गुजरात टायटन्स १८२-५
जेव्हापासून सेट फलंदाज शुबमन गिल बाद झाला तेव्हापासून गुजरात एकापाठोपाठ विकेट्स गमावत आहेत. राजवर्धन हांगरगेकरने विजय शंकरला मिचेल सेंटनरकरवी झेलबाद केले. त्याने २१ चेंडूत २७ धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्स १५६-५
शेवटचे पाच षटके ही दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहेत. त्यात सेट फलंदाज शुबमन अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ६३ धावा केल्या. चेन्नई सामन्यात परत आली असे नाही म्हणता येणार पण थोडे दार मात्र किलकिले केले आहे.
गुजरात टायटन्स १३८-४
शुबमन गिलने १२व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. मिचेल सँटनरच्या दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेत त्याने ५० धावांचा टप्पा गाठला. गुजरातने १२ षटकांत २ बाद १११ धावा केल्या आहेत. शुबमन गिल ३१ चेंडूत ५१ आणि कर्णधार हार्दिक पांड्या ११ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. जडेजाने अफलातून चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केले.
गुजरात टायटन्स १११-३
गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा पहिला इम्पॅक्ट प्लेअर बनवले. केन विल्यमसनची जागा सुदर्शनने घेतली. त्याचा फायदा करत त्याने शुबमन सोबत शानदार अर्धशतकी भागीदारी केली. ती भागीदारी तोडण्यात त्याला यश आले. त्याने १७ चेंडूत २२ धावा केल्या. त्याला राजवर्धन हांगरगेकरने साई सुदर्शनला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.
गुजरात टायटन्स ९०-२
गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा पहिला इम्पॅक्ट प्लेअर बनवले. केन विल्यमसनची जागा सुदर्शनने घेतली. क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनला दुखापत झाली. त्यानंतर तो सामन्यातून बाहेर पडला. साहा बाद झाल्यानंतर सुदर्शनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. गुजरात टायटन्सने आठ षटकांत एक गडी बाद ८९ धावा केल्या आहेत. शुबमन गिल २५ चेंडूत ३७ आणि साई सुदर्शन १४ चेंडूत २० धावा करून नाबाद आहे.
गुजरात टायटन्स ८९-१
चेन्नईने ठेवलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना गुजरातची आक्रमक सुरुवात झाली. शुबमन गिल- साहाने दमदार फटकेबाजी करत हल्लाबोल केला. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. दुसऱ्या बाजूला शुबमन गिल अप्रतिम खेळी खेळत आहे. चेन्नईला भागीदारी तोडण्याची गरज आहे.
गुजरात टायटन्स ६५-१
राजवर्धन हुंगरगेकरने गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला. त्याने अनुभवी फलंदाज रिद्धिमान साहाला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. साहाने १६ चेंडूत २५ धावा केल्या.
गुजरात टायटन्स ३७-१
चेन्नईने ठेवलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना गुजरातची आक्रमक सुरुवात झाली. शुबमन गिल- साहाने दमदार फटकेबाजी करत हल्लाबोल केला.
गुजरात टायटन्स २९-०
चेन्नईने गुजरातचा डाव सुरू होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरवले. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने अंबाती रायडूच्या जागी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची निवड केली. तुषार हा आयपीएलचा पहिला इम्पॅक्ट खेळाडू ठरला.
गुजरात टायटन्स ९-०
आयपीएलच्या १६व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. गुजरातने दोन्ही सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरातसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
चेन्नई सुपर किंग्स १७८-७
माही मार रहा है... अस म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्याने लिटलला त्याला शेवटच्या षटकात गगनचुंबी षटकार आणि त्यानंतर चौकार मारत विंटेज धोनी दाखवून दिले.
चेन्नई सुपर किंग्स १७८-७
१६३ धावांवर चेन्नई सुपर किंग्जची सातवी विकेट पडली. शिवम दुबे १८ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला राशिद खानकरवी झेलबाद केले. आता मिचेल सँटनर महेंद्रसिंग धोनीसोबत क्रीजवर आहे. १९ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात १६५ आहे.
चेन्नई सुपर किंग्स १६३-७
मोठा फटका मारण्याच्या नादात सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाला. त्याने ५० चेंडूत ९२ धावांची तुफानी खेळी केली. त्याचे शतक मात्र हुकले. त्याच्या नो-बॉलच्या वादावरून चेन्नईचे चाहते नाराज आहेत. त्यात जडेजा देखील अवघी एक धाव करून झेलबाद झाला. त्यामुळे आता कर्णधार धोनी आणि शिवम दुबे काय करतात हे पाहणे महत्वाचे आहे.
चेन्नई सुपर किंग्स १५३-६
चेन्नई सुपर किंग्जने १४ षटकांत ४ गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. ऋतुराज शतकाच्या उंबरठ्यावर खेळत आहे. त्याने आठ षटकार आणि चार चौकार मारले आहेत. दुसऱ्या बाजूने शिवम दुबेकडून मोठ्या फटक्यांची गरज आहे. तरच चेन्नई सुपर किंग्स २०० धावांचा आकडा पार करू शकेल.
चेन्नई सुपर किंग्स १४०-४
एका बाजूला ऋतुराज शो सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जोशुआ लिटलच्या धारदार चेंडूवर अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. त्याने १२ चेंडूत १२ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्स १२१-४
चेन्नई सुपर किंग्जच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १०० धावा ओलांडल्या आहेत. ऋतुराज गायकवाड तुफानी फलंदाजी करत ३३ चेंडूत ६९ धावा करत खेळत आहे. त्याला दुसऱ्या टोकाला अंबाती रायुडू साथ देत आहे.
चेन्नई सुपर किंग्स १०७-३
एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूला चौकार-षटकारांची आतिषबाजी करत त्याने शानदार असे अर्धशतक झळकावले. चेन्नईने अजून शंभरी देखील ओलांडली नाही मात्र त्यात त्याचा निम्मा वाटा आहे. सध्या तो खेळपट्टीवर टिकून आहे.
चेन्नई सुपर किंग्स ९१-३
राशिद खानच्या भेदक फिरकीपुढे चेन्नईला मोठे मारण्यात अपयश येत आहे. इंग्लंडच्या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. बेन स्टोक्स ६ चेंडूत ७ धावा करून बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्स ७०-३
कॉनवे बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी चौथ्या षटकाची सुरुवात चांगली झाली. हार्दिकने जोशुआ लिटिलकडे सोपवली. ऋतुराज चेन्नईसाठी स्ट्राइकवर होते. पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर ऋतुराजने सिंगल घेत मोईनला स्ट्राईक दिली. मोईनने चौथा चेंडू डॉट खेळला. पण पाचव्या चेंडूवर चौकार मारला. सहावा चेंडू पुन्हा डॉट होता. या षटकात चेन्नईने १५ धावा केल्या. तिथून त्यांना मोमेंटम मिळाला. नंतर शमीच्या षटकात नो-बॉलवर षटकार आणि नंतर चौकार लगावत मोईनने आपले इरादे स्पष्ट केले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात मोईन अली बाद झाला. त्याने १७ चेंडूत २३ धावा केल्या. राशिदने त्याला बाद केले.
चेन्नई सुपर किंग्स ५१-२
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू झाला. मात्र, चेन्नईला आपल्या भेदक गोलंदाजीने मोहम्मद शमीच्या चेंडूने कॉनेवेला त्रिफळाचीत करत पहिला धक्का दिला. तो ६ चेंडूत केवळ १ धाव करून बाद झाला. यासोबतच शमीने आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या.
चेन्नई सुपर किंग्स १४-१
आयपीएलच्या १६व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू झाला आहे. सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे खेळपट्टीवर उतरले आहेत. गुजरातसाठी मोहम्मद शमीने गोलंदाजीची सलामी दिली.
चेन्नई सुपर किंग्स १०-०
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.
चेन्नईने ११ नंबरच्या खेळाडूला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळणार असल्याचे सांगितले.
डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (c/wk), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे आयपीएलमध्ये आणखीनच रंगत येणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या मैदानावर जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे १८८ पर्यंत धावा केल्या पाहिजेत, कारण या मैदानावर १६०-१७० धावा सहज करता येतात.
जर आपण आयपीएलबद्दल बोललो तर या लीग अंतर्गत अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर फक्त २ सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दोन्ही सामने कमी धावसंख्येचे होते. या दोन सामन्यात एकूण २३ बळी घेतले. त्यापैकी १७ वेगवान गोलंदाज, तर ६ फिरकीपटू झेलबाद झाले.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही मंचावर आला. नाणेफेकीपूर्वी आयपीएल २०२३च्या ट्रॉफीसोबत पोज देताना दोघे.
रश्मिका मंदानाने चेन्नई सुपरकिंग्ससाठी दक्षिण भारतीय चित्रपटातील गाण्यावर सादरीकरण केले. यानंतर त्यांनी श्रीवल्ली या गाण्यावरही आपला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर तिने ऑस्कर पुरस्कार विजेता गाणं नाटू-नाटू यावरही सुंदर नृत्य केले.
तमन्ना भाटियाने एनीम या तेलुगू चित्रपटातील टम टम या गाण्यावर परफॉर्म केले. यानंतर त्याने डिझायर, ऊ-अंतवन या गाण्यांवरही सादरीकरण केले. तमन्ना भाटियाने गुजरात टायटन्स संघासाठी कामगिरी केली.
IPL 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये गायक अरिजित सिंगने पहिला परफॉर्म केला. राझी चित्रपटातील 'आये वतन मेरे वतन' या गाण्याने त्यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर 1983 मध्ये आलेल्या 'लेहरा दो' आणि ब्रह्मास्त्रमधील 'केसरिया तेरा इश्क है पिया' या गाण्याने त्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली. त्यांनी चन्ना मेरे, कबीरा, अपना बना ले पिया, तुझे कितने चाहने लगे हम, झूम जो पठान, शिवा, या मैं गलात, प्यार होता कभी बार है, तेरे प्यार में, घुंगरू टूट गए, राबता ही गाणी गायली. यादरम्यान हार्दिक पांड्याही अरिजितच्या गाण्यावर डान्स करताना दिसला.
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights Match Update: चेन्नई सुपर किंग्स वि गुजरात टायटन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर
गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. शुबमन गिलच्या अर्धशतकाला इम्पॅक्ट खेळाडू साई सुदर्शन व विजय शंकर यांची साथ मिळाली. राशीद खानने मॅजिकल खेळी करून मॅच फिरवली.